रोटरी क्लब आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित नितीन शिरगुरकर पुरस्कृत मि. रोटरी टॉप-10 आंतरमहाविद्यालयीन शरीरसौष्ठव स्पर्धेत लिंगराज महाविद्यालयाच्या व्ही. बी. किरण याने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मि. रोटरी टॉप – 10 चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा किताब पटकाविला.
अंगडी महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित रोटरी अन्नोत्सव निमित्त मि. रोटरी जिल्हास्तरीय व मि. रोटरी टॉप – 10 आंतरमहाविद्याल शरीरसौष्ठव स्पर्धेचे उद्घाटन पुरस्कर्ते नितीन शिरगुरकर, योगेश कुलकर्णी, मनोज पै, बसवराज विभुते, मनोज मायकल, पराग भंडारी, अजित सिद्धन्नावर आदी मान्यवरांच्या हस्ते हणुमान मुर्तीचे पूजन करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. मि. रोटरी टॉप-10 आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत 20 शरीरसौष्ठवपटूंनी भाग घेतला होता. निकाल पुढीलप्रमाणे – 1) व्ही. बी. किरण (लिंगराज) 2) रोहण पाळणकर (जैन), 3) मंदार देसाई (आरपीडी) 4) नितेश गोरल (मराठा मंडल) 5) एन. श्री साई (बीएचएम) 6) विशाल निलजकर (आरपीडी) 7) व्यंकट करेन्नावर (आरपीडी) 8) बुहन बाळेकुंद्री (डॉ. रवी पाटील) 9) महेश देसाई (जैन) 10) युवराज शिंदे (आरपीडी) यांनी विजेतेपद पटकाविले. स्पर्धेनंतर प्रमुख पाहुणे अविनाश पोतदार, नितीन शिरगुरकर, अक्षय कुलकर्णी, मनोज मायकल, अमित साठे, डॉ. संतोष पाटील, किरण अगडी, चेतन पै, सुरेश मेत्राणे यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पदके व भेटवस्तू देण्यात आल्या. पंच म्हणून अजित सिद्धन्नावर, जे. डी. भट्ट, एम. के. गुरव, सुनिल आपटेकर, गंगाधर एम., बसवराज अरळीमट्टी, हेमंत हावळ, प्रशांत सुगंधी, अनंत लंगरकांडे, सुनील पवार, राजू नलवडे, नूर मुल्ला यांनी काम पाहिले तर स्टेज मार्शल म्हणून सुनील राऊत व गजानन हंगीरगेकर यांनी काम पाहिले.