प्रतिनिधी/बांदा-
व्ही एन नाबर प्रशालेचा दहावीचा या वर्षी 100 % निकाल लागला.दहावी परीक्षेसाठी एकूण 35 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते पैकी सर्वच्या सर्व 35 विद्यार्थी विशेष श्रेणीत, उत्तीर्ण झालेत.प्रशालेची कु. युती वसंत राऊळ कु.हिने 96.80%गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळवला.कु. तन्वी मनोज महाबळ हिने 94.60% गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर कु.वैभवी प्रमोद धुरी व कु. संकेत प्रेमानंद देसाई यांनी 94.40% गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले.कु पायल संतोष गावकर हिने93.20% तर कु.मिताली भालचंद्र कोकाटे हिने 93% गुण मिळवून अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक मिळवला.संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश कामत, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ मनाली देसाई ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक ,विद्यार्थी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.