रोगाची तीव्रता वाढली, लसकरणही वेगाने
प्रतिनिधी /बेळगाव
लम्पी नियंत्रणात आणण्यासाठी पशुसंगोपनने पाळीव जनावरांबरोबर गो-शाळेतील जनावरांना ‘लम्पी’ प्रतिबंधक लस दिली आहे. जिल्हय़ात लम्पीचा प्रादुर्भाव झपाटय़ाने वाढत असल्याने लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम अधिक तीव्र केली आहे. पाळीव, भटकी जनावरे याबरोबरच विविध गो-शाळेतील जनावरांना ‘लम्पी’ प्रतिबंधक लस दिली जात आहे.
तालुक्मयात सर्वत्र ‘लम्पी’ संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खबरदारी म्हणून सर्व गावांमधील जनावरांना लस दिली जात आहे. मात्र भटक्मया आणि गो-शाळेतील जनावरांकडे दुर्लक्ष झाले होते. दरम्यान पशुसंगोपन खात्याने शहरातील भटक्मया जनावरांबरोबर हलगा येथील भगवान महावीर आणि भुतरामहट्टी येथील गो-शाळेतील गाय आणि बैलांना लस दिली आहे.
अलीकडे गो-शाळेमध्ये जनावरांची संख्या वाढली आहे. दरम्यान खबरदारी म्हणून या जनावरांना लम्पी प्रतिबंधक लस दिली गेली आहे. साधारण 500 हून अधिक गाय-बैलांना लस दिली. जिल्हय़ात 28 लाखांहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये गाय आणि बैलांना या रोगाची अधिक लागण होत आहे. मागील चार दिवसांत तालुक्मयामध्ये या रोगाची तीव्रता वाढली असून तब्बल 742 जनावरांना या रोगाची लागण झाली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे 158 जनावरे लम्पीमुक्त झाली आहेत.
दीड महिन्यापूर्वी या रोगाचा शिरकाव तालुक्मयात झाला होता. तेव्हापासून केवळ पूर्व भागातच या रोगाचा प्रादुर्भाव होता. मात्र आता सर्वत्र या रोगाने थैमान माजविले आहे. त्यामुळे पशुपालकांची झोप उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तालुक्मयातील 30 हून अधिक जनावरे या रोगाने दगावली आहेत. त्यामुळे तात्काळ उपचार करून रोगाची तीव्रता वाढलेल्या जनावरांना वाचविण्याचे आव्हान पशुसंगोपन समोर आहे. दरम्यान तालुक्मयातील सर्व गावांमध्ये ‘लम्पी’ प्रतिबंधक ‘गोटपॉक्स’ लस दिली जात आहे. आतापर्यंत 30 हजारांहून अधिक जनावरांना लस देण्यात आली आहे.
भटक्मया-गो-शाळेतील जनावरांना ‘लम्पी’ प्रतिबंधक लस
घरातील पाळीव गाय-बैलांबरोबर भटक्मया आणि गो-शाळेतील जनावरांना लम्पी प्रतिबंधक लस दिली गेली आहे. धोका ओळखून प्रथमतः भटक्मया आणि गो-शाळेतील जनावरांचे लसकरण करण्यात आले आहे. धोका वाढत असला तरी लम्पीमुक्त होणाऱया जनावरांची संख्या वाढत आहे.
– डॉ. आनंद पाटील (तालुका पशुवैद्यकीय अधिकारी)