Tarun Bharat

जिल्ह्यातील १ लाख १६ हजार ४९९ पशुधनाचे लसीकरण पूर्ण

सातारा : सातारा जिल्ह्याकडे १ लाख ३१ हजार ९०० एवढ्या लसमात्रा उपलब्ध असून आजअखेर बाधित क्षेत्रातील गावांमध्ये १ लाख ४ हजार ५५० व इतर अबाधित क्षेत्रातील गावांमध्ये ११ हजार ९४९ असे एकूण १ लाख १६ हजार ४९९ पशुधनाचे लसीकरण पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी दिली.

सातारा जिल्ह्यात फलटण, सातारा, खटाव, कराड, पाटण, कोरेगाव, माण, खंडाळा व जावली असे ९ तालुक्यातील ६५ गावांमध्ये लम्पी चर्म रोगाची लागण झाली आहे. आज अखेर गाय ३९१ व ४८ बैल असे एकूण ४३९ जनावरांस लंम्पी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच आज दिनांक २१ सप्टेंबर २२ रोजी जिल्हयामध्ये ७ जनावरांचा मृत्यू झाला असून आज अखेर ७१ गाई व ६ बैल असे एकूण ७७ जनावरे नियमित औषध उपचाराने बरी झालेली आहेत. लम्पी चर्म रोग उपचारासाठी आवश्यक असलेली औषधे शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने आणि तालुका लघु पशुचिकीत्सालायांमध्ये उपलब्ध आहेत.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बाधित क्षेत्राच्या ५ किमी परिघातील एकूण ३९८ गावातील १ लाख ३४ हजार ७३५ पशुधनास लसीकरण करण्यात येत आहे. लम्पी औषधोपचाराने बरा होत असल्याने पशुपालकांनी रोग प्रादुर्भावाची लक्षणे आढळून आल्यास त्यांची माहिती तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात अथवा पशुसंवर्धन विभागाच्या टोल फ्री क्र.१८००२३३०४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र.१९६२ यावर तात्काळ संपर्क साधावा. आज जिल्ह्यास नव्याने पुणे येथुन पशुसंवर्धन विभागाकडून १ लाख ५० हजार इतक्या लसीच्या मात्रा प्राप्त होत असुन याचा उपयोग जिल्ह्यामधील अबाधित क्षेत्रातील गावाचे पशुधनास तात्काळ प्रतिबधात्मक लसीकरण होण्यासाठी उपयोगात आणण्यात येत आहे.

Related Stories

भरदुपारी पावसाचे आगमन

Amit Kulkarni

जिह्याचा लसीकरणात विक्रम

Patil_p

कराडचे गॅंगवॉर कायमचे संपवणार

Patil_p

विद्यार्थी दिवस उत्सव व्हावाः डॉ. आ. ह. साळुंखे

Patil_p

कृष्णा समूहाच्या आईसाहेब हरपल्या

Patil_p

पिकविमा भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी

Archana Banage