Tarun Bharat

वडरगेचा जवान दीपक गायकवाड यांचा हृदयविकाराने मृत्यू

प्रतिनिधी/गडहिंग्लज

वडरगे (ता-गडहिंग्लज) येथील जवान दीपक गायकवाड (वय 34) यांचा झाशी (उत्तरप्रदेश) येथे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. दसऱ्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे वडारगेसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, २००४ साली दीपक गायकवाड हे भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. त्यानंतर आसाम, जम्मू काश्मीर, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आदी ठिकाणी सेवा बजावत सध्या ते झाशी (उत्तरप्रदेश) येथे सेवेत होते. बुधवारी सकाळी ११ च्या दरम्यान त्यांना घरी अचानक चक्कर आलेने जमिनीवर पडले. त्यावेळी त्यांच्या पत्नी पूजा यांनी शेजाऱ्यांना बोलवून दीपक यांना तत्काळ सैन्य दलाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण त्यांचा उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली. ही बातमी कळताच संपूर्ण गावावर दसऱ्याच्या सणादिवशी दुःख पसरले आहे. दीपक यांचे पार्थिव अद्याप सैन्यदलाच्या रुग्णालयातच असून गुरुवारी सकाळी तिथून निघण्याची शक्यता वर्तवली आहे. दीपकच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुले आहेत.

Related Stories

‘गोकुळने म्हैस दूध दर प्रति पॉईंट चाळीस पैसे करावे’

Archana Banage

कोल्हापूर : इचलकरंजीच्या गुंड लाखे गँगमधील फरारी गुन्हेगाराला अटक

Archana Banage

Kolhapur : सांगरूळ येथे मंगळवारी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान – बाळासाहेब खाडे

Archana Banage

‘जागर एफआरपीचा आरधना शक्तीपीठांची’ यात्रेस आज प्रारंभ

Archana Banage

मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

Archana Banage

कोल्हापुर जिल्ह्यात परतीचा पाऊस दाखल,हातकणंगले तालुक्याला पावसाने झोडपले

Archana Banage
error: Content is protected !!