क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथील कंठीरवा स्टेडियमवर कर्नाटक राज्य ऍथलेटीक्स अमॅच्युअर संघटना आयोजित ऍथलेटीक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेनुसार घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऍथलेटीक्स स्पर्धेत बेळगावच्या वैभव पाटीलने 5 हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक पटकाविले आहे.
कंठीरवा स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेत 23 वर्षाखालील मुलांच्या गटात वैभव मारुती पाटीलने 5000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. यावषीच्या मोसमात वैभवने मिळविलेले हे दुसरे सुवर्णपदक आहे. वैभव हा कंठीरवा स्टेडियमवर सकाळ व सायंकाळी दोन सत्रात कसून सराव करत असून त्याला एनआयएस प्रशिक्षक अवलक्की, एल. जी. कोलेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे आणि वडील मारुती पाटील यांचे प्रोत्साहल लाभत आहे.