लेकक्हय़ू फौंडेशनचे आयोजन
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
लेकव्हय़ू फौंडेशन आयोजित बेळगाव हाफ मैरेथॉन स्पर्धेत सानिका नलवडे, ऋतुराज चराणी, प्रिणू यादव, साहील अण्णीगेरी, वैष्णवी रावल, अनिल जाधव यांनी विजेतेपद पटकाविले.
रेसकोर्स मैदानावर घेण्यात आलेल्या या स्पर्धेत 1200 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत 20 किमी हाफ मॅरेथॉन स्पर्धेत 18 ते 35 वयोगाटात पुरूष विभागात महंमद साहील अण्णीगेरीने प्रथम, मधुसूदन माळीने दुसरा, शहाजी कुरियाळकरने तिसरा क्रमांक पटकाविला. महिलांच्या गटात प्रिनू यादवने प्रथम, शर्मिला कदमने द्वितीय तर दीपिका प्रकाशने तिसरा क्रमांक पटकाविला. 10 किमी धावण्याच्या स्पर्धेत 16 ते 35 वयोगटात ऋतुराज चराणीने प्रथम, प्रधान कुरियाळकरने दुसरा, बाबर सुशांतने तिसरा क्रमांक पटकाविला. तर महिला गटात सानिका नलवडेने प्रथम, खुषबू बाघलने दुसरा, अनुष्का अर्जुनने तिसरा क्रमांक पटकाविला. 5 किमी स्पर्धेत पुरूष गटात अनिल जाधवने प्रथम, प्रेम यल्लाप्पा बुरूडने दुसरा तर वेदांत होसुरकरने तिसरा क्रमांक पटकाविला. महिला गटात वैष्णवी रावळने प्रथम, क्रांती विठ्ठलने द्वितीय तर आदिती असुंडीने तिसरा क्रमांक पटकाविला.
स्पर्धेनंतर प्रमुख पाहुणे एमएलआयआरसीचे स्टेशन कमांडर ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जी, डीआयजी राघवेंद्रन, ब्रिगेडिअर दयालन, संगमेश निरानी, डॉ. शशिकांत कुलगोड आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पदके, रोख रक्कम, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एमएलआयआरसीचे जवान, लेकव्हय़ूचे पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.