बिबटय़ाचा अद्याप शोध नाही : कर्मचारी मैदानात तळ ठोकून
प्रतिनिधी /बेळगाव
मागील 26 दिवस शोधमोहिमेनंतर बिबटय़ा हाती लागला नाही. त्यामुळे वनकर्मचारी रेसकोर्स परिसरात तळ ठोकून आहेत. या कर्मचाऱयांचा गणेशोत्सव रेसकोर्स परिसरातच साजरा होणार, असे दिसत आहे.
रेसकोर्स मैदानात बिबटय़ाने दहशत माजविली आहे. यासाठी वनखात्याची यंत्रणा मागावर आहे. या खात्याचे शेकडो कर्मचारी तैनात केले आहेत. काही दिवसांपासून शोधमोहिमेत बिबटय़ाचा थांगपत्ता लागला नाही. बुधवारी गणेशचतुर्थी असल्याने सर्वत्र गणरायांच्या आगमनाचा सोहळा रंगणार आहे. मात्र वनखात्याच्या कर्मचाऱयांचा यंदा गणेशोत्सव रेसकोर्स परिसरातच होणार आहे.
काही दिवसांपासून या बिबटय़ाने वनखात्याला हैराण केले आहे. गणेशोत्सवाला बुधवारपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे वनखात्याच्या कर्मचाऱयांचा गणेशोत्सव यंदा घरात नाही तर रेसकोर्समध्ये होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाची सुटी बिबटय़ाने हिरावून घेतली आहे.
कर्मचाऱयांतून नाराजी
या बिबटय़ाने वनखाते, पोलीस आणि नागरिकांची झोप उडविली आहे. दरम्यान, गणेशोत्सवासाठी घरी जाता येणार नसल्याने काही कर्मचाऱयांतून नाराजी व्यक्त होत आहे.