Tarun Bharat

कॅनडाच्या भगवद्गीता पार्कमध्ये तोडफोड

Advertisements

भारताकडून घटनेची निंदा : कारवाई करा

वृत्तसंस्था / ओटावा

कॅनडाच्या ओन्टेरियो प्रांतात भगवद्गीता पार्कमध्ये झालेल्या तोडफोडीची भारताने निंदा केली आहे. कॅनडामधील भारतीय दूतावासाने याला हेट क्राइम (द्वेषयुक्त गुन्हा) ठरवत चौकशीची मागणी केली आहे. बॅम्पटन शहराच्या या पार्कला पूर्वी ट्रॉयर्स पार्क म्हणून ओळखले जायचे. 28 सप्टेंबर रोजी याचे नाव बदलून श्री भगवद्गीता पार्क करण्यात आले होते. कॅनडाच्या अधिकाऱयांनी श्री भगवद्गीता पार्कमध्ये तोडफोड झालीच नसल्याची भूमिका घेतली आहे.

ब्रॅम्पटनमधील श्री भगवद्गीता पार्कमधील हेट क्राइमची आम्ही निंदा करतो. तसेच कॅनडाच्या अधिकाऱयांना तपास करण्याचे आणि गुन्हेगारांवर लवकरात लवकर कारवाई करण्याचे आवाहन करत असल्याचे ओटावामधील भारतीय दूतावासाने ट्विट करत म्हटले आहे. कॅनडात भारतीय वंशाचे 16 लाख लोक राहतात. चालू वर्षात कॅनडामध्ये हिंदूंच्या दोन मंदिरांवर हल्ले झाले आहेत.

Related Stories

उघडय़ा हातांनी हटविते मधमाशांचे पोळे

Patil_p

5 रिश्टर तीव्रतेचा पाकिस्तानात भूकंप

Patil_p

उत्तर कोरियाकडून हायपरसोनिक क्षेपणास्त्राचे परीक्षण

Patil_p

घामाने चार्ज होणार स्मार्टवॉच अन् मोबाईल

Patil_p

‘या’ तीन देशांची हवा अत्यंत खराब : डोनाल्ड ट्रम्प

datta jadhav

…हे देश म्हणजे सडलेले सफरचंद

datta jadhav
error: Content is protected !!