अहमदाबाद : मुंबईहून गुजरातमधील गांधीनगरला जाणाऱया वंदे भारत एक्स्प्रेसला गुरुवारी अपघात झाला. वाटवा आणि मणिनगर स्थानकांदरम्यान म्हैसींच्या कळपाला रेल्वेची धडक बसली. अपघातात काही म्हैसींचा मृत्यू झाला तर रेल्वेच्या इंजिनचा दर्शनी भाग तुटला. पंतप्रधान मोदींनी नुकतेच मुंबई आणि गांधीनगर दरम्यान नवीन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला होता. नवीन अपग्रेडसह, ही एक्स्प्रेस जास्तीत जास्त 180 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. मात्र, सध्या त्याचा कमाल वेग 130 किमी प्रतितास निश्चित करण्यात आला आहे. अहमदाबाद रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी वंदे भारत एक्स्प्रेसची म्हैसींच्या कळपाला धडक बसल्यानंतर काही वेळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. हा अपघात सकाळी 11.15 च्या सुमारास झाल्याचे पश्चिम रेल्वेचे वरि÷ पीआरओ जे. के. जयंत यांनी सांगितले. अपघातानंतर सकाळी 11ः27 वाजता रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा निश्चित करण्यात आले.


previous post