Tarun Bharat

वनवासमाची महिला खुन प्रकरण; ६५ वर्षीय व्यक्तीच्या आत्महत्येने खळबळ

उंब्रज/प्रतिनिधी
Karad Crime News : कराड तालुक्यातील वनवासमाची येथील महिलेच्या खुन प्रकरणात पोलिसांकडून चौकशी सुरू असलेल्या एका ६५ वर्षीय संशयिताने कृष्णा नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री ही घटना उघडकीस आली असून, नामदेव तुकाराम सुतार (वय -६५ )राहणार वनवासमाची ता.कराड असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वनवासमाची ता.कराड येथील एका ६५ वर्षीय वृद्धाचा कृष्णा नदी पात्राकडेला बेलवडे हवेली गावच्या हद्दीत मळी नावाच्या शिवारात मृतदेह मिळून आला. मासे पकडण्यासाठी गेलेल्या युवकाच्या ही घटना लक्षात आली. त्यानंतर रात्री ८.३० घ्या सुमारास तळबीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आले असून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल डॉक्टरांकडून प्राप्त झाल्याने तळबीड पोलिसांकडून सांगण्यात आले. मृत नामदेव तुकाराम सुतार हे वनवासमाची जुने गावठाण येथील रहिवाशी होते. १६ मार्च रोजी सकाळी ते घरातून निघून गेले होते त्यानंतर १७ रोजी सायंकाळी बेलवडे हवेली गावच्या हद्दीत कृष्णा नदीच्या पात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, आत्महत्या करण्यापुर्वी सुतार यांना तळबीड पोलिसांनी खुनाच्या घटनेतील तपासाच्या अनुषंगाने संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेवून सोडून दिले होते. १४ व १५ मार्च रोजीही नामदेव सुतार यांची चौकशी करण्यात आली होती.

वनवासमाची येथे ७ मार्च रोजी डोंगर पायथ्याला झाडीत ४५ वर्षीय महिला लता मधुकर चव्हाण यांचा निर्घृण खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर या प्रकरणात तळबीड पोलिस ठाण्याचे तपासी अधिकाऱ्यांनी १५ ते २० संशयिताची कसून चौकशी केली आहे. संबधित प्रकरणाचा तपास कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील यांचेकडे होता.

मात्र अद्याप खुनाचा उलगडा होत नसल्याने तपासाच्या दृष्टीने पोलीसांकडून सर्व बाजूंने चौकशी सत्र राबवण्यात आले. यातील सहा संशयिताकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांची चौकशी सुरूच होती. यातीलच सुतार यांनी आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आल्याने वनवासमाची खुन प्रकरणातील तपास पोलीसांच्या दृष्टीने अधिक गुंतागुंतीचा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

खुन व आत्महत्येने गुढ वाढले
वनवासमाची येथील डोंगराच्या वघळीत ४५ वर्षीय विवाहित महिलेचा गळा आवळून डोक्यात दगड मारून निर्दयीपणे खून केल्याची घटना मंगळवार दि. ७ रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर पोलिसांसमोर तपासाचे आवाहन निर्माण झाले. १२ दिवसात खूना मागचे कारण उलगडण्यात तपासी यंत्रणा व पोलीसांना अपयश आले आहे. त्यातच पोलीसांकडून तपासकामी चौकशी करण्यात आलेल्या ६५ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली असून या खुनाचे गुढ अधिकच वाढले आहे.

Related Stories

गणेशोत्सवात पावसाचे तांडव

Patil_p

तारळे भागात वाळू तस्करांवर मंडलाधिकाऱ्यांनी टाकला छापा

Archana Banage

फलटणच्या सराईत तेरा गुन्हेगारांना मोक्का

Patil_p

बँक अकाऊंट हॅक करुन 46 हजारांची फसवणूक

Patil_p

श्री.छ.प्रतापसिंह उद्यान पूर्णत्वास नेणारच : खासदार उदयनराजे

Patil_p

वनवासमाचीतील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत

Patil_p