पेडणे पोलीस स्थानकातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार
प्रतिनिधी /पेडणे
पेडणे पोलीस आणि पेडणे तालुक्मयातील जनता यांच्याशी संवाद साधून त्यांच्या काही समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवले जातील, अशी माहिती पेडणे पोलीस निरीक्षक दत्ताराम राऊत यांनी दिली.
पेडणे पोलीस स्टेशनतर्फे काल रविवारी पेडणे येथे ज्ये÷ नागरिक दिनाचे औचित्य साधून पेडणे तालुक्मयातील ज्ये÷ कलाकार आणि नागरिकांच्या आयोजित गौरव सोहळय़ात ते बोलत होते. यावेळी उपनिरीक्षक विवेक हळर्णकर, उपनिरीक्षक सुमेधा नाईक, पोलीस टीम, पेडणे नगरसेवक सिद्धेश पेडणेकर, पत्रकार महादेव गवंडी आदी उपस्थित होते.
ज्ये÷ नागरिक आणि माजी सरपंच झीला उर्फ नारायण मयेकर, भजनी कलाकार विनायक तळवणेकर, व्हायोलीन वाथक सखाराम मावळणकर, सुभाष गडेकर सूर्यकांत कोटकर, नवसो बांदोळकर, पांडुरंग मयेकर, गोपीचंद आपूले, वासुदेव गडेकर, शांताराम पेडणेकर, सीताबाई पेडणेकर, गोपाळ अमेरकर, रुक्मिणी गडेकर सावित्री गडेकर, राधाबाई मदन गडेकर, आणि श्रीमती पेडणेकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्प आणि मिठाई देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पेडणेचे माजी सरपंच झिला उर्फ नारायण मयेकर यांनी मनोगत व्यक्त करताना पेडणे पोलीस स्टेशन मार्फत आज ज्ये÷ नागरिक दिनाचे औचित्य साधून आमचा सन्मान केला त्या सन्मानाने आम्ही भारावून गेलो आहोत. यापूर्वी असा कधीच पोलीस स्टेशन मार्फत गौरव किंवा ज्ये÷ नागरिकांचा सन्मान झाला नव्हता.
गोपीचंद आपूले यांनी, आजपर्यंत पेडणे पोलिसांतर्फे ज्ये÷ नागरिकांचा गौरव किंवा त्यांना सन्मानित केले नव्हते. परंतु आज ज्ये÷ नागरिकांच्या दिनीच आमचा पेडणे पोलिसांतर्फे सन्मान व्हावा त्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करतो, असे सांगितले.
आम्ही कधी आजच्या दिनी आमचा सन्मान होईल ही स्वप्नात देखील चिंतिले नव्हते. परंतु आमचा सन्मान करून पोलिसांनी आपली एक शान पूर्ण तालुक्मयातीलच नव्हे तर राज्यात उंचावल्याचे मत सखाराम मावळंणकर यांनी व्यक्त केले. यावेळी महादेव गवंडी यांनी सूत्रसंचालन आणि स्वागत केले.