प्रतिनिधी /कुंकळ्ळी
माजी उपमुख्यमंत्री व गोवा प्रदेश भाजप उपाध्यक्ष चंद्रकांत कवळेकर यांच्या बेतूल येथील निवासस्थानी गणेश चतुर्थीनिमित्त बुधवार 7 रोजी अखिल गोवा पातळीवरील 27 व्या घुमट आरती, फुगडी, वेशभूषा आणि रांगोळी अशा चार स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 3 वा. या स्पर्धांना सुरुवात होणार असून विजेत्यांसाठी रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तत्पूर्वी श्री सत्यनारायण महापूजा, आरत्या, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल.
घुमट आरती स्पर्धेत पहिले बक्षीस 15 हजार रु., दुसरे बक्षीस 10 हजार रु., तिसरे बक्षीस 7 हजार रु., फुगडी स्पर्धेत प्रथम बक्षीस 10 हजार रु., द्वितीय बक्षीस 7 हजार रु. व तृतीय बक्षीस 5 हजार रु., रांगोळी स्पर्धेत प्रथम बक्षीस 7 हजार रु., द्वितीय बक्षीस 4 हजार रु., तृतीय बक्षीस 2 हजार रु., वेशभूषा स्पर्धेत प्रथम बक्षीस 5 हजार रु., द्वितीय बक्षीस 3 हजार रु. व तृतीय बक्षीस 2 हजार रु. अशी बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. याव्यतिरिक्त केपे मतदारसंघापुरत्या मर्यादित घुमट आरती स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रथम बक्षीस 7 हजार रु., द्वितीय बक्षीस 5 हजार रु., तर तृतीय बक्षीस 3 हजार रु. अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच सर्व सहभागी कलाकार आणि पथकांना मानधन दिले जाणार आहे.
चतुर्थीनिमित्त कवळेकर हे मागील कित्येक वर्षांपासून स्पर्धा आयोजित करत आले आहेत. आपली संस्कृती, परंपरेचे जतन करणे व कलाकारांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी देणे हा स्पर्धा ठेवण्यामागचा आपला मुख्य उद्देश असल्याचे कवळेकर यांनी सांगितले. स्पर्धेत सहभागी होऊ पाहणाऱया स्पर्धकांनी दिगंबर वा पाईक (7020257104) यांच्याशी संपर्क साधावा, असे त्यांनी म्हटले आहे. भाविकांनी श्री गणपतीच्या दर्शनाबरोबर महाप्रसादाचाही लाभ घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.