प्रतिनिधी / बेळगाव : बेळगाव विमानतळ प्राधिकरणाकडून शनिवारी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. भाषण स्पर्धा, भाषण स्पर्धा, घोषवावय तयार करणे स्पर्धा यासह विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
दक्षता जागरूकता सप्ताह निमित्त विमानतळ प्राधिकरणाकडून स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांना भ्रष्टाचार विरोधी जागृती व्हावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना बक्षीसांचे वितरण करण्यात आले.