Various competitions under Anand Shishuwatika in Kalsulkar English School
सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित , कळसुळकर इंग्लिश स्कुल संचलित आनंद शिशुवाटीका कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. आज पालकांचा आपल्या मुलांशी संवाद तुटत चाललाय. पालकांनी आपल्या मुलांशी वेळ काढून बोललं पाहिजे . तुम्ही जितकं त्यांना समजून घ्याल तितकी ती तुमच्याजवळ व्यक्त होतील आणि मुलांचं आणि पालकांचं बॉण्डिंग परिपक्व होईल, आनंदी पालकत्व कसं होईल या विषयावर प्रमुख वक्त्या लाभलेल्या रेणुताई गावसकर यांनी मत मांडलं. तसेच आनंद शिशुवाटीका याअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पाककला स्पर्धा , रांगोळी स्पर्धा , तसेच पंतग बनवण्याची स्पर्धा खासकरून मुलांच्या पालकांसाठी ठेवण्यात आली होती. या तिन्ही स्पर्धांचे निकाल जाहीर करण्यात आले. पाककला स्पर्धेचे परीक्षण मोंडकर फूड्सच्या संचालिका प्रज्ञा मोंडकर यांनी केलं. स्पर्शाचे निकाल पुढीलप्रमाणे –
पतंग बनवणे निकाल – तृतीय क्रमांक – रिझवान शेख, द्वितीय -प्रदीप सावरवाडकर, तृतीय – सदाशिव सावंत
रांगोळी – तृतीय – चैताली मांजरेकर द्वितीय – योगिता पांगम, प्रथम – सुमित्रा पडते
पाककला – तृतीय – उमा बांदेकर , द्वितीय -सुमित्रा पडते , प्रथम – संचिता कोयंडे
कार्यक्रमाला शैलेश पै, सौ. राजश्री टिपणीस, नम्रता नेवगी, रेणू गावसकर, प्रज्ञा मोंडकर, तसेच मुलांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावंतवाडी / प्रतिनिधी :