प्रतिनिधी/ बेळगाव
बाबले गल्ली, अनगोळ येथील श्री गुरुदेव दत्त सेवा संघ व दत्त मंदिर यांच्यावतीने पाचव्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी दुपारी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
शालेय विद्यार्थ्यांसाठी गीता पठण तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळी विविध युवक मंडळे, सामाजिक संघटना व क्रीडाक्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी केदारी बिर्जे, लक्ष्मण देमजी, गजानन सोमनाचे, बाबुराव हलगेकर, दीपक मुतगेकर, बाळकृष्ण वाळके, सतीश जाधव, कृष्णा बुद्रुक, नागेंद्र बाबले, रामचंद्र पाटील, केशव लोहार, नारायण कर्लेकर, दत्ता गौंडवाडकर, यल्लाप्पा देमजी, विनायक गुंजटकर, मनोहर भांदुर्गे, सचिन गोरले, उमेश कुऱ्याळकर, प्रशांत नाईक, नारायण शेलार, डॉ. अनिल बेळगावी आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले.
कोरोना काळात काम केलेल्या महापालिका सफाई कर्मचारी, साई सेवा संघ, श्रीराम सेना हिंदुस्थान, शिवनेरी युवक मंडळ यांच्यासह इतर संघटनांचाही सत्कार करण्यात आला. उत्तर कर्नाटक चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या वैभवी बुद्रुक, अपूर्वा नाईक, शीतल काकतकर, वैष्णवी बुद्रुक यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. रेवण्णावर, डॉ. जमादार, डॉ. अनिल बोरगावी यांनी कोरोना काळात उत्तम सेवा बजावली. त्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. त्यानंतर शाहीर व्यंकटेश देवगेकर व सहकाऱ्यांनी पोवाडा सादर केला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. भावेश बिर्जे यांनी सूत्रसंचालन केले तर बंटू हलगेकर यांनी आभार मानले.