वार्ताहर /उचगाव
येथील स्वरमंगल कार्यालयामध्ये श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजनेच्यावतीने सत्यनारायण पूजा व पदग्रहण समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिता चौगुले उपस्थित होत्या.
याचे उद्घाटन शिवसोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवराज कदम, ग्रा. पं. अध्यक्ष जावेद जमादार, उपाध्यक्षा मथुरा तेरसे, तुरमुरी ग्रा. पं. उपाध्यक्ष चांगदेव बेळगावकर, निवृत्त मुख्याध्यापक एन. ओ. चौगुले, विवेक सरनोबत, परशुराम खांडेकर, नागराज हाडली आदी उपस्थित होते.