वेंगुर्ले (वार्ताहर)-
स्वराज्य महोत्सव २०२२ अंतर्गत वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीत ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत सर्वांनी मिळून हा उपक्रम यशस्वी करण्याचा निर्धार वेंगुर्ले नगरपरिषद छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे झालेल्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांनी दिली. या बैठकीस उपस्थित मान्यवरात माजी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, माजी उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर, व्यापारी संघाचे सौदागर,भाजपा वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, माजी उपसभापती स्मिता दामले,ज्योती देसाई, माझा वेंगुर्लाचे निलेश चेंदवणकर, राजन गावडे, वृंदा गवंडळकर, गणेश अंधारी, राजू पांगम, बॅ. खर्डेकर कॉलेजचे प्रा.गायकवाड, वैभव म्हाकवेकर आदींचा समावेश होता. या बैठकीत मंगळवार ९ ऑगस्ट रोजी बॅ. खर्डेकर कॉलेज – दाभोली नाका – जुना एस टी स्टँड – शिरोडा नाका – पॉवर हाऊस येथून स्टेडियम पर्यंत मोटारसायकल रॅली, बुधवार १० ऑगस्ट रोजी सकाळी ८ वा. डच वखार येथे स्वच्छता मोहिम, शुक्रवार १२ ऑगस्ट रोजी महिला बचत गटांसाठी विविध कार्यक्रम, शनिवार १३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वा.बॅरिस्टर खर्डेकर कॉलेज – दाभोली नाका – जुना एस टी स्टँड – शिरोडा नाका – पॉवर हाऊस येथून स्टेडियम अशी सायकल रॅली, सेंद्रिय शेती मार्गदर्शन शिबिर, रविवार १४ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वा. वृक्षारोपण, रात्री १०.३० वा. बॅ. खर्डेकर कॉलेज ते दाभोली नाका अशी मशाल फेरी, सोमवार १५ ऑगस्ट रोजी सर्व शासकीय कार्यालये,शाळा, न.प.कार्यालय व नागरिक प्रभातफेरी, मंगळवार १६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत शालेय देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा व इतर सांस्कृतिक कार्यक्रम, बुधवार १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत देशभक्तीपर चित्रपट आदी उपक्रम सर्वांनी मिळून यशस्वी करण्याचे नियोजन करण्यात आले.