वार्ताहर /म्हार्दोळ
गोठण, वेलिंग, म्हार्दोळ येथील श्री शांतादुर्गा शंखवाळेश्वरी देवीचा ‘वर्धापनदिन उत्सव सोहळा’ मंगळवार दि. 31/05/2022 ते गुरुवार दि. 02/06/2022 पर्यंत मोठय़ा उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे.
त्यानिमित्त विविध कार्यक्रम व ‘श्री शांतादुर्गा निलायम टप्पा 2 च्या इमारतीचे उद्घाटन व नवीन रथाचे उद्घाटन प.पू. स्वामी महाराज यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
मंगळवार 31 मे 2022 रोजी स. 8.30 वा. देवकृत्याला प्रारंभ, श्री गणपती पूजन इत्यादी, प्रधान देवता आवाहन, अष्टहवनादी कार्यक्रम. दु. 1.00 वा. लघुपूर्णहुती, मंगलारती, महाप्रसाद, संध्या. 6.00 वा. भजन, आरती व महाप्रसाद होईल.
बुधवार 1 जून 2022 रोजी स. 8.30 वा. हवनादि कार्यक्रम, देवाला शतकलाशाभिषेक, दु. 1.00 वा. लघुपूर्णाहुती, मंगलारती, महाप्रसाद, संध्या. 3.30 वा. प.पू. श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराजांचे अगमन, पाद्यपूजा, आशीर्वचन इत्यादी कार्यक्रम होईल. संध्या. 5.22 वा. प.पू. स्वामी महाराजांच्या हस्ते ‘श्री शांतादुर्गा निलायम टप्पा 2 चे उद्घाटन. संध्या. 5.40 वा. प.पू. स्वामी महाराजांच्या शुभहस्ते नवीन रथाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तद्नंतर रथोत्सव, आरती, रात्रौ. 8.30 वा. आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल.
गुरुवार 2 जून 2022 रोजी स. 8.30 वा. हवन, बलिप्रदान, दु. 12.00 वा. महापूर्णाहुती, आरती, महाप्रसाद, आशीर्वाद, इत्यादी. सर्व भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान समितीतर्फे करण्यात आले आहे.