► प्रतिनिधी/ बेळगाव
सरस्वतीनगर, गणेशपूर येथील श्री स्वयंभू गणेश मंदिर येथे बुधवार दि. 25 रोजी गणेश जयंतीनिमित्त जन्म सोहळा होणार आहे. यानिमित्त सकाळी 6 ते 8 या वेळेत महाअभिषेक व गणेश पूजा, 10 ते 11 गणहोम, 11 ते 12 जन्मोत्सव व कपिलनाथ आरती मंडळातर्फे महाआरती होणार आहे. दुपारी 12 ते 3 या वेळेत महाप्रसाद होईल.
दरम्यान, रविवार दि. 22 रोजी 12 ते 3 या वेळेत महिलांसाठी तिळगूळ समारंभ आयोजित करण्यात आला आहे.