Tarun Bharat

पैंगीण श्रद्धानंद विद्यालयात योगदिनी विविध कार्यक्रम

Advertisements

प्रतिनिधी /काणकोण

पैंगीणच्या श्री श्रद्धानंद विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. विद्यालयाचे शारिरीक शिक्षक दुर्गेश गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्राणायाम, सूर्यनमस्कार व अन्य योगासने सादर केली. त्याचप्रमाणे योग आणि निसर्ग, योग आणि कुटुंब या विषयांवर चित्रकला तसेच घोषणा स्पर्धांचे यावेळी आयोजन करण्यात आले. विद्यार्थी प्रतिनिधी रिद्धी टेंग्से आणि नितिशा रेडकर यांची योगदिनाचे महत्त्व सांगणारी भाषणे झाली.

  या समारंभाला पैंगीणच्या माजी जिल्हा पंचायत सदस्या डॉ. पुष्पा अय्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते समई प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. अय्या यांनी योगदिनाचे महत्त्व विषद करताना विद्यार्थ्यांच्या जीवनात योगाचे महत्त्व किती आहे आणि पुढील जीवनात त्याचा कसा लाभ होतो त्याची माहिती प्रात्यक्षिकांसह दिली. दुर्गेश गावकर यांनी आभार मानले.

Related Stories

माशेलात साने गुरुजी पुण्यतिथी कार्यक्रम

Amit Kulkarni

स्वयंपूर्ण मित्रांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

Patil_p

कुडचडेत सर्वेक्षणास चांगला प्रतिसाद

Omkar B

गोवा दूरदर्शनवर आजपासून ‘झिलबा राणो’

Omkar B

तार नदीवरील पूल 30 मे पर्यंत खुला

Amit Kulkarni

जमशेदपूर – मुंबई सिटी एफसी यांच्यात बांबोळीत आज महत्वपूर्ण लढत

Amit Kulkarni
error: Content is protected !!