Tarun Bharat

शरद पवार यांच्या उपस्थितीत आज विविध कार्यक्रम

प्रतिनिधी /बेळगाव

माजी केंद्रीय मंत्री व खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत बुधवार दि. 11 रोजी बेळगावमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8 वाजता बसवाण गल्ली येथे मराठा बँकेच्या अमृतमहोत्सवी सोहळय़ात पवार सहभागी होणार आहेत.

त्यानंतर दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभामध्ये सहभागी होणार आहेत. ज्योती महाविद्यालय येथे सकाळी 10.30 वा. होणाऱया या कार्यक्रमात साप्ताहिक राष्ट्रवीरचा शताब्दी महोत्सवही होणार आहे.

दरम्यान, मंगळवारी सकाळी शरद पवार यांचे बेळगावला आगमन झाले. बेळगावचे उद्योगपती अरविंद गोगटे त्यांचे घनि÷ मित्र. अरविंद गोगटे यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे शरद पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन मंगल गोगटे, माधव गोगटे यांचे सांत्वन केले.

Related Stories

लक्ष्मी टेकडी येथील सांडपाणी रस्त्यावर

Amit Kulkarni

मनपा निवडणूक पुन्हा घ्या

Amit Kulkarni

नवरात्रोत्सवात रंग भरणाऱ्या टिपऱ्यांचे आकर्षण

Omkar B

बेळगाव-हैदराबाद ठरला सर्वाधिक लोकप्रिय विमानमार्ग

Amit Kulkarni

पक्ष बळकटीसाठी संघटितपणे काम करा

Omkar B

स्पोर्टिंग फुटबॉल चषक स्पर्धेत एमएसडीएफ विजेता

Amit Kulkarni