Tarun Bharat

टायकॅथॉन उपक्रमांतर्गत टाकावू बाटल्यांपासून विविध प्रतिकृती

प्रतिनिधी /बेळगाव

सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळावा आणि पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचा उपयोग करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी टायकॅथॉन उपक्रमांतर्गत शनिवारी एसपीएम रोड येथे छत्रपती शिवाजी उद्यानासमोर विविध प्रतिकृती उभारण्यात आल्या.

महापालिकेच्यावतीने स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. टाकावूपासून टिकावू वस्तू बनविण्यात येऊ शकतात. याबाबत सातत्याने जागृती केली जाते. या अंतर्गत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार महापालिकेच्यावतीने विविध स्पर्धांचे आयोजन आणि जागृती मोहीम राबविण्यात येत आहे. टायकॅथॉन उपक्रमांतर्गत शहरात किल्ला तलाव परिसरात सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता. त्याचप्रमाणे टाकावू प्लास्टिक बाटल्यांपासून एसपीएम रोड, शिवाजी उद्यानासमोर विविध प्रतिकृती उभारण्यात आल्या.

नागरिकांनी प्लास्टिकच्या बाटल्या इतरत्र, गटारी-नाल्यांमध्ये न टाकता त्यांचा उपयोग करता येऊ शकतो. कचराकुंडीच्या ठिकाणी अशा विविध प्रतिकृतींची उभारणी करून परिसर स्वच्छ ठेवण्यासह पर्यावरण राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शनिवारी विविध ठिकाणी अशा प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. यावेळी स्वच्छता निरीक्षक शिल्पा कुंभार, कलावती, मनपाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

कोणत्याही यशाला शॉर्टकट नाही!

Amit Kulkarni

खरीप हंगामात पीक विम्याचे संरक्षण

Amit Kulkarni

उत्तरप्रदेशच्या रोहित रामाची खानापूर मॅरेथॉनमध्ये बाजी

Amit Kulkarni

बेकिनकेरेत डॉक्टारांचा सत्कार

Patil_p

मणगुत्ती क्रॉसजवळ बेकायदा तांदूळ जप्त

Omkar B

येडूरवाडीतील जवानाचे पार्थिव बेळगावमध्ये दाखल

Rohit Salunke