श्रमिक पत्रकार संघाची माहिती : उपक्रमाला सर्व पत्रकारांचे सहकार्य अपेक्षित
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हय़ातील श्रमिक पत्रकारांच्या विकासासाठी अनेक योजना हाती घेण्यात आल्या आहेत. बदलते तंत्रज्ञान, पत्रकारांचे आरोग्य, त्यांच्या मुलांचे शिक्षण, निवासस्थानाचा प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेने कार्यक्रम आखले आहेत. या उपक्रमाला सर्व पत्रकारांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे आवाहन श्रमिक पत्रकार संघटनेचे गौरवाध्यक्ष डॉ. भीमसी जारकीहोळी व जिल्हाध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे यांनी केले.
शुक्रवारी येथील एका खासगी हॉटेलमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील आवाहन केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजशेखर पाटील, पुंडलिक बाळोजी, श्रीशैल मठद, यल्लाप्पा तळवार, श्रीकांत कुबकड्डी, चेतन होळय़ाप्पगोळ, मंजुनाथ पाटील आदींसह संघटनेचे वेगवेगळे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिलेले गुरुसिद्धाप्पा पुजारी व ज्ये÷ पत्रकार रेहमत केंचगार यांचा सत्कार करण्यात आला.
येत्या महिनाभरात विश्वेश्वरय्यानगर परिसरात अत्याधुनिक पत्रकार भवनाची कोनशिला बसविण्यात येणार आहे. पाच वृत्तपत्र विपेत्यांना ई-बाईक व शंभर विपेत्यांना सायकली, बॅग वितरित करण्याचा कार्यक्रम हेणार आहे. पत्रकारांसाठी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा भरविण्यात येणार आहे, असेही कुरुंदवाडे यांनी सांगितले.
पत्रकारांच्या मुलांसाठी आयएएस, आयपीएस, केएएस परीक्षा देण्यासाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पत्रकारांच्या आरोग्य रक्षणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. आरोग्य तपासणी शिबिरे भरविण्याबरोबरच पत्रकार आणि पत्रकारिता या विषयावरील बदलते कायदे यासंदर्भातही पत्रकारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
संघटनेने पत्रकारांसाठी माफक दरात भूखंड देण्याची योजना हाती घेतली आहे. पत्रकारांसाठी क्रीडा स्पर्धा भरविणे, पत्रकारांच्या कुटुंबीयांचा स्नेहमेळावा भरविणे, आदी कार्यक्रमांबरोबरच इच्छुक पत्रकारांना प्रशिक्षणासाठी मुंबई, दिल्ली, बेंगळूरला पाठविण्याचीही योजना असून मराठी, कन्नड, इंग्रजी, हिंदी आदी सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन हे उपक्रम यशस्वी करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.