माजी मंत्री दिलीप पऊळेकर यांचे प्रतिपादन
वार्ताहर /शिवोली
जग स्पर्धात्मक होत चालले आहे. मुलांनामध्ये शर्यती लागत आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक स्पर्धा घेतला जातात. विविध देवस्थानेसुद्धा स्पर्धा घडवून आणतात व या स्पर्धांमधून मुलांना आपली शैली दाखविता येते व अशा मुलांना घडवून आणण्यासाठी देवस्थानांचा मोठा हात असतो असे प्रतिपादन माजीमंत्री दिलीप पुरुळेकर यांनी केले.
पिळर्ण येथील श्री आंब्रेकरनाथ देवस्थानच्या वर्धापनदिनानिमित्त उद्योजक देवानंद नाईक पुरस्कृत ‘अखिल गोवा नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन समई प्रज्वलनाने झाले. यावेळी माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. सन्माननीय पाहुणे देवानंद अर्जुन नाईक देवस्थानचे उपाध्यक्ष सुरज सावळेकर कोषाध्यक्ष अमेय पेडणेकर विठ्ठल रखुमाई देवस्थानचे अध्यक्ष विलास सावळेकर व परीक्षक नितीन कोरगावकर व आलिशा सिमेपुरुषकर उपस्थित होत्या. तमुलांना व्यासपीठ देण्याच्या स्पर्धा घेऊन उत्तेजन देण्यात येत असल्याबद्दल देवस्थान समितीचे श्री. परुळेकर यांनी अभिनंदन केले. उद्योजक देवानंद नाईक म्हणाले की आपली संस्कृती जपण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत व मुलांना व्यासपीठ देऊन पुढे आणण्याचा आमचा प्रयत्न आहे माजी मंत्री दिलीप परुळेकर यांचे या देवस्थानासाठी योगदान आहे. नितीन कोरगावकर यांनी स्पर्धकांना उद्देशून सांगितले की स्पर्धेत बक्षीसासाठी म्हणून सहभागी न होता आपले उत्कृष्ट सादरीकरण करून रसिकांची दाद मिळेल याकडे हा उद्देश ठेवा कारण रसिकांची दात हेच मोठे बक्षीस असते.
केपे येथील दित्या दुर्गेश शिरवळीकर हिने प्रथम बक्षीस पटकावले शांतिनेश पणजी येथील नव्या सुनील नाईक शिल्लक द्वितीय तर सांगोल्डा येथील अरुणा तोडणकर हिला तृतीय बक्षीस प्राप्त झाले साखळी येथील तनिष्का पालेकर व सांगोला येथील अवनी दीपक पालेकर यांना उत्तेजनात बक्षीस देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परेश सावळेकर यांनी केले. केदार पेडणेकर यांनी गुलाब पुष्प देऊन मान्यवरांचा स्वागत केले.