Tarun Bharat

जलतरण स्पर्धेत वरुण, ऋषिकेशची चमक

राणी चन्नम्मा आंतरमहाविद्यालयीन जलतरण स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

जमखंडी येथे बीएलडी महाविद्यालय आयोजित राणी चन्नम्मा विद्यापीठ सिंगल झोन आतंरमहाविद्यालयीन जलतरण स्पर्धेत जीएसएस महाविद्यालयाचे वरुण धामणकर, ऋषिकेश जाधव यांनी 9 सुवर्ण, 3 रौप्य, 8 कांस्यपदकासह 6 वैयक्तिक विक्रम नोंदवून घवघवीत यश संपादन केले.

बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन जलतरण स्पर्धेत वरुण सुधीर धामणकरने 200 मी. फ्रीस्टाईल, 200 मी. ब्रेस्टस्ट्रोक, 50 मी. ब्रेस्टस्ट्रोक या तिन्ही प्रकारात प्रथम क्रमाकासह 3 सुवर्णपदक तर 100 व 200 मी. बटरफ्लाय स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले. त्याने या स्पर्धेत 6 वैयक्तिक विक्रम नोंदविले आहेत. ऋषिकेश अमित जाधवने 200 व 100 मी. बॅकस्ट्रोक, 100 मी. ब्रेस्टस्ट्रोक स्पर्धेत 3 सुवर्णपदके, 200 मी. ब्रेस्टस्ट्रोक, 50 मी. बॅकस्ट्रोक स्पर्धेत 2 रौप्य तर 100 मी. फ्रीस्टाईल व 50 मी. ब्रेस्टस्ट्रोकमधील कांस्यपदक पटकाविले आहे. त्याचप्रमाणे ओम होनगेकरने 100 मी. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये रौप्य, आशुतोष बेळगुंदीने 50 मी. बॅकस्ट्रोकमध्ये कांस्य, भुवन कडोलीने 200 मी. बॅकस्ट्रोकमध्ये कांस्यपदक पटकाविले. त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य बी. एल. मजुकर, क्रीडा प्राध्यापक व इतर प्राध्यापकवर्गाचे प्रोत्साहन लाभत आहे.

Related Stories

कुत्र्यांचे आज मोफत रेबीज लसीकरण

Amit Kulkarni

पावसामुळे वीजपुरवठा विस्कळीत

Amit Kulkarni

तालुक्यात लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद

tarunbharat

जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तन्वी पाटीलची निवड

Amit Kulkarni

कोरोना रोखण्यासाठी मिळून प्रयत्न करण्याची गरज

Omkar B

महिलांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे

Omkar B