Tarun Bharat

वरवरा राव यांना जामीन संमत

Advertisements

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भीमा कोरेगाव प्रकरणी अटक करण्यात आलेले डाव्या चळवळीतील कार्यकर्ते आणि शहरी नक्षलवादाचा आरोप असणारे वरवरा राव यांना सर्वोच्च न्यायालयाने नियमित जामीन संमत केला आहे. राव सध्या अंतरिम जामीनावर होते. त्यांना आरोग्य विषयक समस्यांच्या कारणास्तव जामीन देण्यात आला आहे.

अंतरिम जामीनाचे रुपांतर नियमित जामीनात करावे अशी मागणी करणारी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती. न्या. यु. यु. लळित यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने त्यांना हा दिलासा दिला. हा जामीन त्यांना प्रामुख्याने प्रकृतीच्या कारणास्तव दिला गेला आहे. त्यांचे वय आता 82 वर्षांचे आहे. या वयात अनेकांचा उत्साह पूर्वीसारखा रहात नाही. ते या वयात आणि अशा शारीरिक स्थितीत काही गैरकृत्य करण्याची शक्यता नगण्य आहे. आतापर्यंत त्यांना अंतरिम जामीन देण्यात आला आहे. या जामीनाचा त्यांनी दुरुपयोग केलेला नाही. या वयात काही लोक मॅरेथॉनमध्ये भाग घेऊ शकतात तर काही लोक ऐंशी-नव्वद वर्षांपर्यंत दणकट असतात. मात्र साऱया वयस्करांची स्थिती तशीच असते असे नाही, असे निर्णयपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

जामीनाच्या अटी

नियमित जामीन देताना न्यायालयाने अनेक अटीही घातल्या आहेत. आरोपीने बृहन्मुंबई क्षेत्राच्या बाहेर पूर्वानुमतीशिवाय जाऊ नये. त्यांनी जामीनावर सुटकेचा दुरुपयोग करु नये. तसेच कोणत्याही साक्षीदाराच्या संपर्कात येऊ नये किंवा त्याच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करु नये, अशा या अटी आहेत.

Related Stories

उत्तर भारत गारठला

Patil_p

भारत बनणार सेमीकंडक्टर निर्मितीचे हब

Amit Kulkarni

कुटुंबातील 15 जण शरयू नदीत बुडाले

Patil_p

पुढील वर्षी भारतीय स्टार्टअपचा उपग्रह झेपावणार

Patil_p

बिहारमध्ये सापडले सर्वात मोठे सुवर्णभांडार

Patil_p

मुलांचे लसीकरण लवकरच -आरोग्यमंत्री

Patil_p
error: Content is protected !!