Tarun Bharat

वास्को पीडीएतही गैरप्रकार उघडकीस

Advertisements

नगरनियोजनमंत्र्याकडे वास्कोच्या आमदारांची कारवाईची मागणी

प्रतिनिधी /वास्को

मुरगाव नियोजन व विकास प्राधिकरणातही बेकायदेशीर प्रकार घडल्याचे उघडकीस आलेले असून हे प्रकार नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्या नजरेस आणून देण्यात आल्याचे वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी म्हटले आहे. मंत्री राणे गोव्याच्या हितासाठीच जमीन व्यवहारातील बेकायदेशीर गोष्टींविरूध्द कारवाई करीत असून त्यांना पाठींबा देणे योग्य असल्याचे आमदार साळकर यांनी म्हटले आहे.

वास्कोत माध्यमांशी बोलताना वास्कोचे आमदार तसेच दक्षिण गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष दाजी साळकर यांनी नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे मंत्री म्हणून करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले. गोव्यातील शेती भाती वाचवण्यासाठी व पर्यायाने गोव्याच्या व गोव्याच्या लोकांच्या हिताचे कार्य ते करीत असल्याचे स्पष्ट करून बेकायदा जमीन रूपांतरणाच्या प्रकाराविरूध्द त्यांनी आरंभलेली कारवाई योग्यच आहे. सर्वांनी अशा गैरप्रकारांविरूध्दच्या कारवाईला पाठींबा द्यायला हवा असे आमदार साळकर म्हणाले.

मुरगाव नियोजन व विकास प्राधिकरणातही बेकायदा प्रकार घडलेले असून आमच्या नजरेस जे बेकायदा प्रकार आलेले आहेत त्यांची माहिती नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांना देण्यात आलेली आहे तसेच अशा प्रकारांविरूध्द कारवाई करण्याची मागणी मंत्र्यांकडे करण्यात आलेली असल्याचे आमदार साळकर यांनी म्हटले आहे.

Related Stories

गोव्याच्या कायापालटासाठी प्रामाणिक, दूरष्दृष्टी नेत्याची गरज

Amit Kulkarni

अभिनेत्री पूनम पांडेच्या विरोधात आरोपपत्र दाखल

Amit Kulkarni

सर्वोच्च न्यायालयाची रस्ते सुरक्षा समिती उद्या गोव्यात

Patil_p

मायनिंग ‘डंप’ निर्यातीला आता विरोध नको

Patil_p

सुकूर वेताळ देवस्थानच्या अध्यक्षपदी नारायण हिरोजी

Amit Kulkarni

आय-लीगमध्ये चर्चिल-एजॉल बरोबरी; सुदेवा एफसीचा विजय

Amit Kulkarni
error: Content is protected !!