Tarun Bharat

वास्कोचे जुने मासळी मार्केट इतर विक्रेत्यांसाठी खुले करा

Advertisements

काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाच्या अध्यक्षांची मागणी

प्रतिनिधी /वास्को

वास्को शहरातील नुतनीकरण करण्यात आलेले जुने मासळी मार्केट खुले करण्याची मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. येत्या दीड महिन्यात हे मार्केट खुले करण्यास पालिका अपयशी ठरल्यास हे मार्केट आम्ही खुले करू असा ईशारा त्यांनी दिला आहे.

गोवा प्रदेश काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नझीर खान तसेच त्यांचे पदाधिकारी साजिद खान, ऍल्वीनो आरावजो व इतर कार्यकर्त्यांनी मार्केटबाहेर बसणाऱया तेथील विक्रेत्यांसमवेत बुधवारी निदर्शने केली व वास्को शहरातील जुने पालिका मार्केटमध्ये असलेले मासळी मार्केट अन्य विक्रेत्यांसाठी खुले करण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

नझीर खान यांनी यावेळी बोलताना सांगितले की, सध्या या मार्केटचे नुतनीकरण करण्यात आलेले आहे. नुतनीकरण करूनही मागचे साधारण दीड वर्ष हे मार्केट बंदच ठेवण्यात आलेले आहे. यामागे राजकीय वाद होता. मात्र, अशामुळे स्थानिक व्यापाऱयांना चांगल्या मार्केटला मुकावे लागत आहे. मार्केट तयार असताना अनेक जण मार्केटच्या बाहेर फुटपाथवर बसून फळविक्री व इतर व्यवसाय करतात. उन्हातान्हात तसेच पावसाळय़ात त्यांना त्रास सहन करावा लागतो. वाहतुकीचीही कोंडी होते. वाहने पार्किंगला त्रास होतो. त्यामुळे पालिकेने हे मार्केट या विक्रेत्यांसाठी खुले करावे असे नझीर खान यांनी स्पष्ट केले. येत्या दीड महिन्यात हे मार्केट खुले न केल्यास ते आम्ही खुले करू असेही नझीर खान यांनी म्हटले आहे.

मुरगाव पालिकेच्या कारभाराबबात त्यांनी व त्यांच्या इतर पदाधिकाऱयांनी नाराजी व्यक्त केली. हे मार्केट 15 दिवसांत खुले करू असा ठराव पालिका मंडळाने घेतला होता. मात्र, त्या ठरावाची कार्यवाही केली नाही. पालिकेकडे महसुल प्राप्त करण्याची क्षमता किंवा ईच्छा नाही. पालिकेचा कारभार भोंगळ आहे. राज्याच्या नगरविकासमंत्र्यांनी मुरगाव पालिकेच्या कारभारात लक्ष घालावे अशी मागणीही नझीर खान यांनी केली आहे.

Related Stories

खनिज चोरी प्रकरणी पोलीस तक्रार नोंद

Patil_p

अपघातात जखमी झालेल्या देवसु येथील युवकाचा मृत्यू

Omkar B

रेल्वेत 5.70 लाखाची बॅग चोरणारा वास्कोतून जेरबंद

Amit Kulkarni

अधिकाऱयाविरोधात मोपा विमानतळावर कामगारांचा मोर्चा

Amit Kulkarni

मिकी पाशेको यांचा राष्ट्रवादीला रामराम

Amit Kulkarni

हेदोडे येथील नदीत बुडून दीपक खरवत यांचे दुर्दैवी निधन

Omkar B
error: Content is protected !!