कोरोनामुळे (Corona) तब्बल दोन वर्षांनी वट पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार असल्याने यंदा महिलावर्गात उत्साहाच वातावरण पाहायला मिळत आहे. हिंदू धर्मात प्रत्येक सणाला खूप महत्त्व आहे. त्यातय सुहासणी महिलांसाठी वट पौर्णिमा व्रताला अधिक महत्त्व दिले जाते. आपल्या पतीला दिर्घायुष्य लाभू दे म्हणून खूप कडक उपवास यादिवशी महिला करतात. हिंदू पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला वट पौर्णिमा व्रत केले जाते. (Vatpornima 2022)
भारतात वट पौर्णिमाची ही पध्दत वेगवेगळ्या पध्दतीने साजरी केली जाते. जसे की उत्तर भारतातील यूपी, मध्य प्रदेश, बिहार, दिल्ली, पंजाब, हरियाणात हे व्रत अमावस्येला केली जाते. तर गुजरात, महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात हे व्रत पौर्णिमेच्या दिवशी केले जाते. यादिवशी साज-शृगांर करुन महिला आपल्या पतीला दिर्घायुष्य लाभू दे म्हणून वडाची पूजा करतात. काहीजण घरीच वडाचे झाड आणून पूजा करतात. मात्र नोकरदार महिलांना वेळेत पूजा करणे जमेलच असे नाही. अशावेळी काळजी करु नका. आजच्या वट पौर्णिमेचा नेमका मुहुर्त कोणता आणि कधीपर्यंत आहे. यासंदर्भात तुम्हाला माहिती देणार आहोत ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. चला तर जाणून घेऊया.
वट पौर्णिमा शुभ मुहूर्त
वट पौर्णिमेला मुहुर्तावरच पूजा केली जाते. प्रत्येक महिलेला मुहुर्त टळू नये असे वाटतं असते. यासाठी त्यांची आधीच तयारी सुरु होते. यंदा मात्र मुहूर्त हा मंगळवारपासून बुधवार पहाटे पर्यंतचा आहे. व्रताचा मुहूर्त 14 जून 2022 रोजी सकाळी 9:40 ते 15 जून 2022 रोजी पहाटे 5:28 पर्यंत असेल. त्यामुळे मुहूर्त चुकण्याची भिती मनातून काढून टाका. आणि वटपोर्णिमेचा आनंद घ्या.
वट पौर्णिमा व्रताचे महत्त्व
वट पौर्णिमेचा उपहास हा सौभाग्यवती स्त्रियांचा मुख्य सण आहे. या दिवशी महिलांना अखंड सौभाग्यवती राहण्याची इच्छा असते. या दिवशी यमराजासह सत्यवान-सावित्रीची पूजा केली जाते. वट सावित्रीच्या उपासनेने सुख-समृद्धी येते. तसेच घरात लक्ष्मी वास करते, असे मानले जाते. सर्व विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वट सावित्रीचे व्रत करतात.

