प्रतिनिधी /खानापूर
येथील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी बाबासाहेब माने यांची चिकोडी येथील नगरसभेत मुख्याधिकारी म्हणून बढती मिळाल्याने त्यांची बदली झाली होती. खानापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीपदी आर. के. वठार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी पंचायतीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात आर. के. वठार यांचे स्वागत करण्यात आले. तर बाबासाहेब माने यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश बैलूरकर होते. उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगीसह इतर नगरसेवक उपस्थित होते.
आर. के. वठार हे कोलार जिल्हय़ातील मुळभावी येथील नगरसभेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांना के. एम. एस. ग्रेड वन म्हणून बढती झाल्याने त्यांची खानापूर येथे बदली करण्यात आली आहे. तर बाबासाहेब माने यांची चिकोडी नगरसभेत बढती झाल्याने त्यांची मुख्याधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे. शुक्रवारी नगरपंचायतीत बाबासाहेब माने यांना निरोप देण्यात आला. यावेळी त्यांना नगरपंचायतीच्यावतीने भेटवस्तू व शाल, श्रीफल देवून सत्कार करण्यात आला. तर आर. के. वठार यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रेमानंद देशपांडे यांनी प्रास्ताविक करून वठार यांचा परिचय करून दिला. सुहास गुरव यांनी आभार मानले.
यावेळी नगरसेवक नारायण ओगले, रफिक वारीमणी, अप्पय्या कोडोळी, मेघा कुंदरगी यासह नगरपंचायत कर्मचारी राजू जांबोटी, एस. के. पाटील यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.