प्रतिनिधी /वाळपई
महिलांच्या पारंपरिक परंपरेचा भाग असलेला वटपौर्णिमेचा उत्सव सत्तरी तालुक्मयात उत्साहात साजरा करण्यात आला. सुवासिनींनी विविध ठिकाणी वटवृक्षाची विधिवत पूजा करून सात फेरे बांधून वटपौर्णिमा व्रत साजरे केले. पावसाने सायंकाळपर्यंत पूर्णपणे विश्रांती घेतली होती.
वटपौर्णिमेनिमित्त सौभाग्यवती महिला उपवास करतात वडाचे पूजन करून आपल्या पतीसाठी आयुष्य मागतात, अशी प्रथा आहे. सत्तरी तालुक्मयात हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून दुपारपर्यंत विविध ठिकाणी वटवृक्षाच्या भोवती फेऱया घालून व त्याचे पारंपरिक पद्धतीने पूजन करून हा उत्सव साजरा करताना दृष्टीस पडल्या.
काही महिलांनी घरातच वटवृक्षाच्या फांद्या आणून पूजा केली. अनेक ठिकाणी मात्र मोठय़ा प्रमाणात महिलांनी वटवृक्षाच्या पूजा केली. पूर्णपणे पारंपारिक वेष परिधान करून हा उत्सव साजरा करण्यावर भर दिला. काही ठिकाणी सकाळी ब्राह्मणांकरवी पूजाअर्चा केली.
सौभाग्यवती महिलांमध्ये उत्साह : महिमा गावकर
गोव्यात वटपौर्णिमा साजरी करण्याची परंपरा रूढ झालेली आहे. वटवृक्षाची पूजा करून वटपौर्णिमेचा सण साजरा करण्याचा आनंद वेगळाच असतो. जन्मोजन्मी हाच पती मिळावा असा संदेश देणारा हा पारंपरिक उत्सव म्हणजे सौभाग्यवती महिलांसाठी आनंद व्यक्त करणारी एक वेगळी प्रक्रिया असल्याची प्रतिक्रिया सावर्डे येथील महिमा गावकर यांनी व्यक्त केली.
पूर्वतयारीसाठी अंगात वेगळाच प्रकारचा संचार : अंजली नाईक
हा उत्सव साजरा करण्यासाठी पूर्वतयारी करताना एक वेगळय़ा प्रकारचा संचार अंगामधे भरत असतो. यामुळे सौभाग्यवती महिलांसाठी अशा सणांमध्ये सहभागी होण्यात एक विशेष असा सन्मान प्राप्त होत असतो अशी प्रतिक्रिया होंडा सत्तरी येथील अंजली नाईक यांनी व्यक्त केली.
सणात सहभागी होणे वेगळाच आनंद : प्रियदर्शनी गावकर
वटपौर्णिमेचा सण हा सौभाग्यवती महिलांसाठी विशेष आनंद निर्माण करणारा आहे. आज खऱयार्थाने या सणांमध्ये भाग घेताना एक वेगळय़ा प्रकारचा आनंद वाटत आहे.