Tarun Bharat

वटपौर्णिमेचे पूजासाहित्य बाजारात विक्रीसाठी दाखल

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

मंगळवार दि. 14 रोजी वटपौर्णिमा साजरी होणार असून पौर्णिमेपासून व्रतवैकल्ये आणि सणांना प्रारंभ होईल. वटपौर्णिमेच्या निमित्ताने बाजारात पूजेचे साहित्य दाखल झाले असून शहरात मुख्य बाजारपेठेसह सर्वत्र पूजा साहित्याचे स्टॉल दिसून येत आहेत.

वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा केली जाते. त्यासाठी वडाच्या डहाळय़ा तोडल्या जातात. ही बाब पर्यावरणासाठी हानिकारक असल्याची कितीही जागृती केली तरी बाजारपेठेत वडाच्या डहाळय़ा घेऊन विपेते उपस्थित असतात.

वटपौर्णिमेच्या पूजेचा पाट, त्याचबरोबर पूजा साहित्य असलेले द्रोण विक्रीस आले असून त्यांची खरेदी सुरू आहे. यामध्ये मणी मंगळसूत्र, हळद-कुंकू, जोडवी आणि वडाला गुंडाळण्याचा धागा, बांगडय़ा असे साहित्य आहे.

वटपौर्णिमेच्या पूजेसाठी जांभूळ, आंबा, धामणं आणि फणसाचे गरे यांची आवश्यकता असल्याने बाजारात या फळांची आवक वाढली आहे. यंदा फणसाची आवक वाढली असली तरी अपेक्षेइतकी त्यांची खरेदी झालेली नाही. आता पौर्णिमेच्या निमित्ताने तरी फणस किंवा गऱयांची खरेदी होईल, अशी आशा विपेत्यांना आहे.

Related Stories

अचानक गॅस वाहिनी फुटल्याने उडाला गोंधळ

tarunbharat

कार-दुचाकी अपघातात दुचाकीस्वार ठार

Tousif Mujawar

फराळासाठी पोहे, शेंगदाण्यांना मागणी

Omkar B

गोल्डन व्हॉईसच्या अंतिम फेरीत चार संघ दाखल

Amit Kulkarni

कोरोनाकाळात 648 शुभमंगलना परवानगी

Amit Kulkarni

लिलावती पॅलेस चषक स्पर्धेत बेळगाव स्पोर्ट्स क्लब विजेते

Amit Kulkarni
error: Content is protected !!