प्रतिनिधी /बेळगाव
वेदांत फौंडेशन बेळगाववतीने दहावीतील गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. करिअर गाईडन्स शिबिरात अव्वलस्थानी आलेल्या विद्यार्थ्यांचा वेदांत फौंडेशनच्यावतीने सत्कार करण्यात आला. रोख रक्कम, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे सत्काराचे स्वरुप होते.
यावेळी फौंडेशनचे उपाध्यक्ष सुनील देसुरकर म्हणाले, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही दरवषी विद्यार्थ्यांचा सन्मान करणार आहोत. त्यांना खेळासोबतच अभ्यासाकडे जास्तीत जास्त लक्ष देता येईल.
यावेळी अमोघ कौशिक, रविना बसरीमरद एम. व्ही. हेरवाडकर स्कूल, सूरज पाटील सेंट मेरीज, जिजा शहापूरकर, निशिता गुंजीकर बालिका आदर्श, आदिती मजुकर संत मीरा या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
प्रा. डॉ. डी. एन. मिसाळे यांनी प्रथम व द्वितीय क्रमांकाची रु. 1000 व रु. 900 ची बक्षिसे दिली. तृतीय रु. 800 प्रशांत बिर्जे, चतुर्थ श्रीकांत आजगावकर यांनी 500 रु., पाचवे रु. 500 सुजाता लोखंडे यांच्यातर्फे तर सहावे रु. 500 मराठी शाळा क्र. 35 मजगावचे शिक्षक रघुनाथ उत्तुरकर यांनी दिले. शिक्षिका जयश्री पाटील यांच्याकडून विद्यार्थ्यांना शाल प्रदान करण्यात आली.
अध्यक्षस्थानी युवराज रत्नाकर, अतिथी म्हणून विरेश किवडसन्नावर, श्रीकांत आजगावकर, असिफ अत्तार उपस्थित होते. प्रास्ताविक ईश्वर पाटील, सूत्रसंचालन एन. डी. मादार यांनी, तर अस्मा नाईक यांनी आभार मानले. असिफ अत्तार यांच्याकडून अल्पोपाहार देण्यात आला.