१४ वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत करणाऱ्या प्रकाश ठाणेकरला अटक
गोकुळ शिरगाव/प्रतिनिधी
उजळाईवाडी (ता. करवीर ) अमन पार्क, उजळाईवाडी येथील १४ वर्षीय मुलीसोबत भाजी विक्रेत्याने लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील कृत केले. तसेच भाजी परत घेण्यास न आल्यास ब्लॅक मेल करण्याची धमकी देणाऱ्या प्रकाश बळवंत ठाणेकर (रा. उजळाईवाडी) या भाजी विक्रेत्यांची महिलांकडून चांगलीच धुलाई करण्यात आली. तर गोकूळ शिरगाव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाल्याने भाजी विक्रेत्यास पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत गोकूळ शिरगाव पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार अमन पार्क, उजळाईवाडी येथील १४ वर्षीय मुलगी सकाळी अकराच्या सुमारास भाजी आणण्यासाठी गेली होती. भाजी विक्रेता प्रकाश बळवंत ठाणेकर (ग्रामपंचायत गल्ली, उजळाईवाडी) याने सदर मुलीला काय भाजी पाहिजे म्हणून टेम्पो जवळ बोलावून घेतले आणि कोणी आसपास नसल्याचे पाहून मुलीसोबत लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील कृत केले. तर कुठे वाचता केलीस तर तुझ्या बहिणीला ब्लॅकमेल करण्याची धमकी दिली.याबत सदर मुलीने घडलेला प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर समस्त ग्रामस्थांनी भाजी विक्री करणाऱ्या ठाणेकराची धुलाई केली. याबाबतची फिर्याद मुलीने गोकूळ शिरगाव पोलीस ठाण्यात दिल्याने लैंगिक अपराधा पासून बालकांचे संरक्षण गुन्ह्याखाली त्याला अटक केली आहे. याबाबतचा तपास गोकूळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि अविनाश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ शेख करत आहेत.