Tarun Bharat

वजन कमी करण्यासाठी आहारात समावेश करा ‘या’ ३ सूपचा

Advertisements

Vegetable Soup Recipes : वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबत डायट असणे खूप गरजेचे असते. व्यायामाचे जसे आपण शेड्यूल बसवतो तसेच आहाराचे देखील शेड्यूल बसवणे गरजेचे असते. याचबरोबर आहारात प्रोटीन, कॅल्शिअम,फायबर व्हिटामीन आणि मिनरल असं फुल न्यूट्रीशन कसं मिळेल आणि कॅलरीज कशा कमी होतील याचा विचार करायला हवा. यासाठी आहारात सूपचा वापर आठवड्यातून तिनवेळा करा. यासाठी व्हेजेटिरीयन सूपचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. कोणत्या त्या आज जाणून घेऊया. सोबतच सूप कसे बनवायचे याची रेसीपी जाणून घेऊया.

टोमॅटो सूप

टोमॅटो सूप बनवण्यासाठी टोमॅटो, दूधी भोपळा, गाजर बीट, आल्लं, लसून आणि कांदा एकत्र करून कुकरमधून तिन शिट्ट्या काढून घ्या. त्यानंतर मिक्समधून काढून घ्या किंवा त्यानंतर गाळून किंवा तसेच घेवून त्यात काळी मिरी, सेंदोलोन मीठ, काळी मिरी किंवा चिली फेक्स घालू शकता. यामुळे पोट ही भरेल आणि वजन कमी होण्यास मदत होते.

पालक सूप
पालक सूप बनवण्यासाठी पालक, मूग डाळ, कोबी, आल्लं, लसून, कांदा एकत्र कुकरमधून तिन शिट्ट्या काढून घ्या. त्यानंतर गाळून किंवा तसेच घेवून त्यात काळी मिरी, सेंदोलोन मीठ किंवा चिली फेक्स घालू शकता. एक वाटी पालकामध्ये तिन ते चार चमचे डाळ वापरा. तुमच्या आवडीनुसार भाजी कमी जादा घालू शकता.

मिक्स भाजी सूप

मिक्स भाजी सूप बनवण्यासाठी परस बी, गाजर, कोबी, टोमॅटो, काश्मीर मिरची, कोबी, आल्लं, लसून, कांदा घालून कुकरमधून तिन शिट्ट्या काढून घ्या. यामध्ये तुम्ही मटार, फ्लाॅवर, ब्रोकोली घालू शकता. कॅलरीज कमी करण्यासाठी आणि फायबरची मात्रा वाढवण्यासाठी सूप गरजेचे आहे.

टीप- सूप बनवत असताना मका, बटाटा, काॅर्नफ्लोअर वापरणे टाळा. टेस्टसाठी काळी मिरी, जिरं पावडर, चिली फेक्स याचा वापर करा. कारण आपण वजन कमी करण्यासाठी सूप पिणार आहोत. त्यामुळे वजन वाढतील असे पदार्थ त्यात अॅड करू नका. याशिवाय हाॅटेमध्ये सूप घेणं टाळा. यात मैदा,काॅर्नफ्लोअरचा वापर करताता.

Related Stories

देशात सक्रिय रुग्णसंख्येत घट

Abhijeet Shinde

समोसा सँडविच

tarunbharat

West Bengal Election 2021 Result Live: नंदीग्राममध्ये अद्याप मतमोजणी सुरु – ममता बॅनर्जींनी ट्वीट करत दिली माहिती

datta jadhav

सरकारच्या परवानगीनेच फोन टॅपिंग ; रश्मी शुक्लांचा दावा

Abhijeet Shinde

राऊत कुटुंबियांची वाईन उद्योगात भागिदारी : सोमय्या

datta jadhav

कुपवाडमध्ये मोकाट कुत्र्यांचा जनावारांवर हल्ला : मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष

Rahul Gadkar
error: Content is protected !!