वाहन चालविण्यासाठी इंधन म्हणून अल्कोहोल (मद्यार्क) चा उपयोग आता नवीन राहिलेला नाही. अनेक देशांमध्ये पेट्रोलमध्ये अल्कोहोल मिसळून अशा मिश्र इंधनावर वाहने चालविली जाऊ शकतात. मात्र, हे अल्कोहोल इथेनॉल या प्रकारचे असते. तथापि, दिल्ली आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी इथेनॉलचाच जुळा भाऊ मानल्या गेलेल्या मिथेनॉलवर वाहने चालविणे शक्मय करून दाखविले आहे. मिथेनॉलची किंमत पेट्रोलच्या सध्याच्या किमतीच्या एक पंचमांश म्हणजे अवघी 20 रुपये लिटर इतकी पडते. मात्र, पेट्रोलच्या दुप्पट मिथेनॉलचा उपयोग करावा लागतो. याचाच अर्थ असा, की हे इंधन पेट्रोलच्या अडीच पट स्वस्त पडू शकते.
मिथेनॉल अत्यंत कमी प्रतीच्या दगडी कोळशापासून बनविले जाऊ शकते. दिल्ली आयआयटीचे संशोधक शंतनू रॉय यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. सध्या पुणे येथे प्रायोगिक तत्वावर कोळशापासून मिथेनॉल बनविण्याचा छोटेखानी प्रकल्प उभा करण्यात आला आहे. भारतात कमी प्रतीच्या कोळशाचे प्रचंड साठे आहेत. हा कोळसा वीज तयार करण्यासाठी वापरल्यास मोठय़ा प्रमाणावर राख उत्पन्न होते. नंतर ती राख कोठे साठवायची? हा प्रश्न पडतो. त्यामुळे भारताला उच्च प्रतीचा कोळसा ऑस्ट्रेलियातून आयात करावा लागतो. भारतात सापडणाऱया कमी प्रतीच्या कोळशापासून व्यापारी तत्वावर मोठय़ा प्रमाणात मिथेनॉल तयार करणे शक्मय झाल्यास भारताची द्रव इंधनाची समस्या बऱयाच प्रमाणात सुटू शकेल, असा विश्वास प्राथमिक संशोधनावरून संशोधकांना वाटू लागला आहे. मिथेनॉलवर वाहने चालविण्यासाठी वाहनांच्या रचनेत थोडासा बदल करावा लागतो. सध्या 100 ते 125 सीसी मोटारसायकली या इंधनावर चालविण्याचा प्रयोग होत आहे. यासाठी मोटारसायकलचा प्लग आणि कॉर्बोरेटरचे डिझाईन काही प्रमाणात बदलावे लागत आहे. मोठय़ा इंजिनाच्या वाहनांमध्ये 85 टक्के मिथेनॉल आणि 15 टक्के पेट्रोल उपयोगात आणले जाऊ शकते, असे दिसून आले आहे. सध्या या प्रकल्पावर निति आयोगाचे बारकाईने लक्ष असून हा प्रयोग यशस्वी झाल्यास भारतासाठी ते मोठे वरदान ठरणार आहे, असे मत अनेक रासायनिक तज्ञांनी व्यक्त केले आहे.