Tarun Bharat

व्हेलॉसिटी-सुपरनोव्हाज आज अंतिम लढत

Advertisements

वृत्तसंस्था/ पुणे

महिलांच्या टी-20 चॅलेंज क्रिकेट स्पर्धेत गुरूवारी येथे झालेल्या सामन्यात ट्रेलब्लेझर्सने व्हेलॉसिटीचा 16 धावांनी पराभव केला पण त्यांना अंतिम फेरीसाठी आपली पात्रता सिद्ध करता आली नाही. सरस धावसरासरीच्या जोरावर व्हेलॉसिटीने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. शनिवारी या स्पर्धेत व्हेलॉसिटी आणि सुपरनोव्हाज यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ट्रेलब्लेझर्स संघाने 20 षटकांत 5 बाद 190 धावा जमवित व्हेलॉसिटीला 191 धावांचे कठीण आव्हान दिले. या स्पर्धेतील ट्रेलब्लेझर्स संघाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. ट्रेलब्लेझर्स संघाला या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी या सामन्यात व्हेलॉसिटी संघाला 159 धावांमध्ये रोखणे जरूरीचे होते. पण व्हेलॉसिटी संघाने 20 षटकांत 9 बाद 174 धावा जमवित या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.

ट्रेलब्लेझर्स संघातर्फे एस. मेघना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी अर्धशतके झळकविली. या दोघींच्या अर्धशतकामुळे ट्रेलब्लेझर्सला 190 धावापर्यंत मजल मारता आली. रॉड्रिग्जने 44 चेंडूत 66 तर मेघनाने 47 चेंडूत 73 धावा जमविल्या. या जोडीने 73 चेंडूत 113 धावांची भागिदारी केली. कर्णधार स्मृती मानधना एका धावेवर बाद झाली. मॅथ्यूजने 15 चेंडूत 27 तर डंकलीने 8 चेंडूत 19 धावा जमविल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना व्हेलॉसिटी संघाची अष्टपैलू किरण नावगिरेने 5 षटकार आणि 5 चौकारांसह 34 चेंडूत 69 धावा फटकावल्या. 19 व्या षटकांत व्हेलॉसिटी संघाने 159 धावांचा टप्पा ओलांडला. व्हेलॉसिटी संघाने 20 षटकांत 9 बाद 174 धावा जमविल्याने त्यांना हा सामना 16 धावांनी गमवावा लागला. ट्रेलब्लेझर्सतर्फे पुनम यादव आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक ः ट्रेलब्लेझर्स- 20 षटकांत 5 बाद 190 (मेघना 73, रॉड्रिग्ज 66, मॅथ्यूज 27, डंकली 19), व्हेलॉसिटी-20 षटकांत 9 बाद 174 (किरण नावगिरे 69,  पुनम यादव 2-33, राजेश्वरी गायकवाड 2-44).

Related Stories

पंकज अडवाणी राष्ट्रीय बिलियर्ड्स चॅम्पियन

Patil_p

विदेशी संघांचे न्यूझीलंड दौरे निश्चित

Patil_p

राष्ट्रीय वुशू स्पर्धा श्रीनगरमध्ये

Patil_p

न्यूझीलंडचे खेळाडू इंग्लंडला रवाना

Patil_p

दुलीप चषक फायनलमध्ये पश्चिम विभाग 8 बाद 250

Patil_p

खेलरत्न पुरस्कारासाठी ‘या’ दोन खेळाडूंची बीसीसीआयकडून शिफारस

Archana Banage
error: Content is protected !!