Vengurle N.P. Administrative officer Sangita Kubal honored by National Congress
वेंगुर्ले नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल यांना नवी मुंबई येथील महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशन या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावाजलेल्या संस्थेतर्फे ‘दी प्राईड ऑफ महाराष्ट्र : एमजेएफ अवॉर्ड’ देऊन नुकतेच गौरविण्यात आले. यानिमित्त वेंगुर्ले तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष तथा माजी नगरसेवक विधाता सावंत, महिला शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेविका कृतिका कुबल, माजी नगरसेवक दादा सोकटे आदी उपस्थित होते.
वेंगुर्ले (वार्ताहर)-