विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.
वेंगुर्ले (वार्ताहर)-
Vengurle no. W. Swachhotsav at Camp Triveni Garden!
वेंगुर्ले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी स्वच्छतेत अग्रेसर असलेल्या नगर परिषदेचे स्वच्छतेतील सातत्य राखण्याचे चांगल्या प्रकारे नियोजन केले आहे. स्वच्छोत्सव सारखा आगळा वेगळा उपक्रम राबवून महिलांनाही महिला बचत गटांच्या माध्यमातून प्रोत्साहीत केले आहे. प्रशासकीय कारभार असताना त्यांनी राबविलेला उपक्रम वाखाणण्याजोगा आहे असे प्रतिपादन वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले. तसेच वेंगुर्ले शहरात स्वच्छता थीम अंतर्गत पर्यटन महोत्सव आयोजित करावा अशी सुचनाही मांडली.महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग वाढविणे व त्यांचे स्वच्छतेमधील नेतृत्व निर्माण करण्यासाठी वेंगुर्ले नगरपरिषदेतर्फे बुधवार २९ मार्च रोजी वेंगुर्ले कॅम्प येथील त्रिवेणी गार्डन येथे स्वच्छोत्सव २०२३ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या स्वच्छोत्सवाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते दीपप्रजनाने झाले. या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरात मुख्याधिकारी परितोष कंकाळ, माजी नगराध्यक्ष प्रा.डॉ. पुजा कर्पे, माजी उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर, सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, प्रशांत आपटे, उमेश येरम, अँड. सुषमा प्रभू-खानोलकर, पर्यावरण दुत डाँ. प्रा. धनश्री पाटील, प्रा. आनंद बांदेकर, स्वच्छतादूत सुनील नांदोस्कर, माजी नगरसेविका साक्षी पेडणेकर, श्रेया मयेकर, पुनम कदम आदींचा समावेश होता.
यावेळी पर्यावरण दूत असलेल्या बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या प्राध्यापिका जीवशास्त्रीय अभ्यासिका डॉ. धनश्री पाटील यांनी स्वच्छतेबरोबरच कांदळवन स्वच्छता व कांदळवनाची जोपासना करण्याची खरी गरज का आहे. हिच कांदळवने आपल्यावर येणाऱ्या संकटांना परतावून लावणारी आहेत. याची उदाहरणे देत नागरिकांनी कांदळवन स्वच्छता राखीव व कांदळवनाचे जतन करावे. असे आवाहन केले.
यानिमित्त विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.या स्वच्छोत्सवाचा मुख्य उद्देश महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग व त्यांचे स्वच्छते मधील नेतृत्व साजरे करणे हा होता. या अंतर्गत महिला बचत गटांच्या महिलांकरिता वेंगुर्ले नगरपरिषदेने झिरो वेस्ट फूड फेस्टिवल फुड फेस्टिव्हल चे आयोजन केले होते. यात वेंगुर्ले शहरातील 12 महिला बचत गटांनी सहभाग घेतला होता. सर्व स्टॉलधारक महिलांनी कर्नाटक व केरळ प्रमाणे केळीच्या पानांचा केळीच्या द्रोणांचा वापर या महोत्सवात करण्यात आला होता. हा फूड फेस्टिवल हा कार्यक्रम झीरो वेस्ट इव्हेंट म्हणुन साजरा करण्यात आला. यामध्ये महिला बचत गटांचे मार्फत खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर परिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी, सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते काका सावंत यांनी, तर उपस्थितांचे आभार माजी नगरसेवक प्रशांत आपटे यांनी मानले.सदर स्वच्छोत्सव कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी नगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, वैभव म्हाकवेकर, पूजा मसुरकर, जयेंद्र चौधरी, अतुल अडसूळ, विलास ठुंबरे यासह सफाई कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.