उमेश गंगणे उत्कृष्ट पोझर, जिल्हास्तरीय शरीरसौष्टव स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा शरीरसौष्टव असोसिएशन आयोजित किरण जाधव पुरस्कृत अविघ्न क्लासिक जिल्हास्तरीय शरीरसौष्टव स्पर्धेत फिटनेस जीमच्या वेंकटेश ताशिलदारने अविघ्न क्लासिक हा मानाचा किताब तर एसएस फौंडेशनच्या उमेश गंगणेने उत्कृष्ट पोझरचा किताब पटकाविला.
रामनाथ मंगल कार्यालय येथे आयाबीबीएफ मुंबईच्या नियमानुसार 7 वजनी गटात ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धा निकाल : 55 किलो गट- 1) आकाश निंगराणी (पॉली फाउंडेशन), 2) रितिक लाके (युनिक जिम निपाणी), 3) रोहित सापळे (समर्थ जिम), 4) जोतिबा बिरजे (भवानी जिम), 5) रोहन अल्लुर (कार्पोरेशन जिम). 60 किलो गट- 1) आफताब किल्लेदार (गोल्ड लाईफ), 2) मंजुनाथ सोनटक्के (अविघ्न फिटनेस), 3) उमेश गंगणे (एस एस फाउंडेशन), 4) सुहास दिवटे (फिटनेस पावर), 5) जोतिबा सावंत (बी स्ट्राँग). 65 किलो गट-1) वेंकटेश तहसीलदार (फिटनेस), 2) नागेश संताजी (आविघ्न फिटनेस), 3) उमेश सांबरेकर (मेणशे फिटनेस), 4) शिवकुमार पाटील (बी स्ट्राँग), 5) गणेश पाटील (मोरया जिम). 70 किलो-1) प्रताप कालकुंदीकर (बेलगाम रेसिडेन्सी), 2) विकास शहापूरकर (अविघ्न फिटनेस), 3) सुनील भातखंडे (एक्स्ट्रीम जीम), 4) संदीप पावले (मॉडर्न जीम), 5) रोहन पालनकर (बॉडी टून). 75 किलो- 1) अफरोज तहसीलदार (गोल्ड जिम), 2) ओमकार कडेमनी (अविघ्न फिटनेस), 3) दीपक रेडकर (वज्र जिम), 4) विनय डोणकरी (लाईफ टाईम फिटनेस), 5) यल्लाप्पा गावडे (एसआरएस फिटनेस). 80 किलो-1) महेश गवळी (रुद्र जीम), 2) सनी मयेकर (फिटनेस क्लब खानापूर), 3) समंत गौडा (अविघ्न फिटनेस), 4) गजानन काकतीकर (एस एस फौंडेशन), 80 किलोवरील-1) नितीन पाटील (फिटनेस क्लब खानापूर), 2) विजय पाटील (बी स्ट्राँग).
त्यानंतर अविघ्न क्लासिक किताबासाठी आकाश निंगरानी, आफताब किल्लेदार, वेंकटेश ताशिलदार, प्रताप कालकुंद्रीकर, आफरोज ताशिलदार, महेश गवळी, नितीन पाटील यांच्यात लढत झाली. त्यामध्ये वेंकटेश ताशिलदार, अफरोज ताशिलदार, महेश गवळी यांच्यात तुलनात्मक लढत झाली. त्यामध्ये फिटनेस जीमच्या वेंकटेश ताशिलदारने अविघ्न क्लासिक हा मानाचा किताब पटकाविला. त्यांना प्रमुख पाहुणे पुरस्कर्ते किरण जाधव, पुर्णिमा सांबरेकर, पवन काकतकर, प्रकाश पुजारी, अजित सिद्दण्णावर, गंगाधर एम. हेमंत हावळ आदी मान्यवरांच्या हस्ते चषक, मानाचा किताब, 7001 रूपये रोख, प्रमाणपत्र व भेटवस्तू देवून तर उत्कृष्ट पोझर उमेश गंगणेला 1111 रूपये रोख, चषक देवून गौरविण्यात आले.
यावेळी स्पर्धेसाठी पंच म्हणून अजित सिद्दण्णावर, प्रकाश पुजारी, अरळीकट्टी, गंगाधर एम., हेमंत हावळ, अनंत लंगरकांडे, सुनील राऊत, सुनील पवार, सुनील अष्टेकर, नलवडे, नूर मुल्ला, एम. के. गुरव यांनी काम पाहिले.