वृत्तसंस्था /न्यूयॉर्क
येथे 29 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान होणाऱया 2022 च्या टेनिस हंगामातील शेवटच्या अमेरिकन खुल्या ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत बुधवारी अमेरिकन टेनिस संघटनेने महिलांच्या प्रमुख ड्रॉ मध्ये आठ महिला टेनिसपटूंना वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आला असल्याची घोषणा केली असून यामध्ये अमेरिकेची माजी अव्वल वरि÷ महिला टेनिसपटू व्हीनस विल्यम्सचा समावेश आहे.
महिला एकेरीच्या प्रमुख ड्रॉ मध्ये या स्पर्धेत 2020 साली ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकणाऱया सोफिया केनिनचा समावेश आहे. अमेरिकेच्या व्हीनसने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत सातवेळा ग्रॅण्डस्लॅम अजिंक्मयपदे मिळविली असून 2022 च्या टेनिस हंगामात तिने वॉशिंग्टनमध्ये झालेल्या सिटी खुल्या टेनिस स्पर्धेत एकेरीत आपले पुनरागमन केले होते. व्हीनसने आतापर्यंत दोनवेळा अमेरिकन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. 2020 नंतर या स्पर्धेत व्हीनसचे यावेळी पुनरागमन होत आहे. अमेरिकन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत यापूर्वी सोफिया केनिन ही स्पर्धा जिंकणारी शेवटची अमेरिकन महिला टेनिसपटू आहे. मध्यंतरी दुखापतीमुळे तिला टेनिस क्षेत्रापासून अलिप्त रहावे लागले होते. या स्पर्धेच्या महिला प्रमुख ड्रॉ मध्ये अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्स, सोफिया केनिन, कोको व्हॅन्डेवेग, एलिझाबेथ मंडलिक, पेटन स्टिम्स, एलिना यॅ या अमेरिकन महिला टेनिसपटूंना वाईल्डकार्ड प्रवेश देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाची जेमी फोर्लिस आणि फ्रान्सची हार्मनी टेन यांचाही समावेश आहे. 29 ऑगस्टपासून महिला एकेरीच्या प्रमुख ड्रॉ मधील सामन्यांना प्रारंभ होईल.