वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या सिटी महिलांच्या खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेची वयस्कर आणि माजी अव्वल टेनिसपटू व्हीनस विल्यम्सला एकेरीच्या पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला.
या स्पर्धेतील महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात कॅनडाच्या रिबेका मॅरिनोने व्हीनसचा 4-6, 6-1, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. व्हीनसने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत सातवेळा ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. व्हीनसने यापूर्वी म्हणजे 2021 च्या ऑगस्टमध्ये शिकागो येथील स्पर्धेत आपला शेवटचा सहभाग दर्शविला होता. या स्पर्धेमध्ये व्हीनसला सु वेई ने पराभूत केले होते. व्हीनसने विंबल्डन स्पर्धेत मिश्र दुहेरीत जेमी मरेसमवेत आपला सहभाग दर्शविला होता.
सिटी खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत अन्य सामन्यात टॉप सिडेड पेगुला आणि माजी टॉप सिडेड सिमोना हॅलेप यांनी विजयी सलामी दिली. अमेरिकेच्या पेगुलाने आपल्याच देशाच्या बॅप्टिस्टेचा 6-2, 6-2, रुमानियाच्या हॅलेपने स्पेनच्या क्रिस्टिना ब्युकेसाचा 6-3, 7-5 असा पराभव करत दुसऱया फेरीत स्थान मिळविले.
या स्पर्धेत पुरुषांच्या विभागात ब्रिटनच्या माजी टॉप सिडेड अँडी मरेचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. स्वीडनच्या मिकेल येमेरने मरेवर 7-6 (8-6), 4-6, 6-1 त्याचप्रमाणे कायली हेडमंडने वेटानुकीचा 6-4, 7-6 (8-6) असा पराभव करत दुसऱया फेरीत स्थान मिळविले.