फाईल केल्यानंतर 30 दिवसांच्या आत हे काम करावे लागेल
सदरची प्रक्रिया न केल्यास आयटीआर रिटर्न राहणार अपूर्ण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आर्थिक वर्ष 2021-22 करीता इनकम टॅक्स रिटर्न (आयटीआर) फाईल जमा करण्याची अंतिम तारीख नुकतीच समाप्त झाली आहे. यामध्ये जर आपण आयटीआर फाईल दाखल केली आहे, तर आता त्याचे व्हेरिफिकेशन करणेही आवश्यक आहे. या प्रक्रियेशिवाय संबंधीतांची आयटीआर फाईल ग्राहय़ धरण्यात येणार नसल्याची माहिती आहे. आयटीआर फाईल करण्याच्या अंतिम टप्प्यात जर का फॉर्म जमा नाही केला, तर त्याचे व्हेरिफिकेशन केले जाते. यामध्ये ऑनलाईन पद्धतीनेच हे व्हेरिफिकेशन करण्यात येते. याची थोडक्यात प्रक्रिया बघणार आहोत.
30 दिवसांच्या आत व्हेरिफिकेशन करणे आवश्यक
विना व्हेरिफिकेशन इनकम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची प्रक्रिया अपूर्ण मानली जाते. त्यामुळे व्हेरिफिकेशननंतर इनकम टॅक्स विभागांच्या मार्फत आयटीआर प्रोसस करता येते. त्याव्यतिरिक्त आयटीआरला जर व्हेरिफिकेशन केले नाही तर मिळणारा परतावा अडकून पडणार. या अगोदर रिटर्न भरण्यासाठी 120 दिवसांपर्यंत व्हेरिफिकेशन करावे लागत असे. परंतु आता हा कालावधी कमी करुन तो 30 दिवस केला आहे.
5 कोटी 83 जणांनी भरला रिटर्न ः
आर्थिक वर्ष 2021-22 साठी 5 कोटी 83 लोकांनी इनकम टॅक्स रिटर्न (आयटीआर) दाखल केला आहे. प्राप्तिकर विभागाच्या माहितीनुसार शेवटची तारीख 31 जुलै रोजी जवळपास 72.42 लाख रिटर्न फाईल करण्यात आल्या आहेत.
इनकम टॅक्स व्हेरिफिकेशनची प्रक्रिया ः
1.आयटीआर फाईलचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी पॅनला आधार लिंक आवश्यक
2.सर्वात प्रथम ई फाइलिंग पोर्टल incometax.gov.in वर जाऊन लॉगिन करावे
3.याच्यानंतर आपल्याला पुढील पानावर जाऊन इ फायलिंगचा पर्याय मिळणार
4.यामध्ये जात आयटीआर सेक्शनमधील व्हेरिफिकेशनचा पर्याय निवडावा
5.यानंतर यामध्ये आपले आयटीआर झाले आहे ते पाहणे
6.यानंतर ई व्हेरिफिकेशन लिंकवर जाऊन व्हेरिफिकेशन रिटर्न युजिंग आधार ओटीपीचा पर्याय निवडावा
7.या प्रक्रियेनंतर तर नोंदणीकृत मोबाईलवर मॅसेज प्राप्त होताच, त्याच्या आधारे व्हेरिफिकेशन करता येते.