ऑनलाईन टीम / तरुण भारत :
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मागील 15 दिवसांपासून उपचार सुरू आहेत. मात्र, आता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
अभिनेते म्हणून विक्रम गोखले यांची हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख आहे. गोखले यांनी चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून चरित्रनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच त्यांनी लेखक आणि दिग्दर्शक म्हणूनही काम पाहिले. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनय-संन्यास घेतला आहे.
अधिक वाचा : जेलमध्ये मंत्र्यांची मजा! सत्येंद्र जैन यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल
गोखले सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत भूमिका साकारत आहेत. काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय मालिका ‘अग्निहोत्र’मध्ये त्यांनी साकारलेली मोरेश्वर अग्निहोत्री ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. याच महिन्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘गोदावरी’ हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांनी जितेंद्र जोश, नीना कुळकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे यांच्यासोबत काम केलं. या चित्रपटाच्या शूटिंगच्या आधीही ते रुग्णालयात दाखल होते. डिस्चार्ज मिळताच त्यांनी शूटिंगला सुरुवात केली होती. गोखले नवोदित कलावंतांना अभिनयाचं प्रशिक्षण देण्याचंही काम करत आहेत.