Tarun Bharat

ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे निधन; 50 फूट खोल कालव्यात कोसळली फॉर्च्युनर

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

फॉर्च्युनर कार 50 फूट खोल कालव्यात कोसळून झालेल्या भीषण अपघातात ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांची कन्या, नात आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अंबिका अण्णा देशमुख (वय 34), जान्हवी अण्णा देशमुख (10), अण्णा देशमुख (35) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. हे सर्वजण मोडनिंबहून पंढरपूर कडे निघाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मीना देशमुख रविवारी रात्री आपल्या कुटुंबासह मोडलिंबकडून पंढरपूरकडे निघाल्या होत्या. रात्रीच्या वेळी या रस्त्यावरील अरुंद पुलावरून गाडी जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि 50 फूट खोल उजनी डावा कालव्यात त्यांची गाडी कोसळली. अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मदतकार्याला सुरुवात केली. गावकऱ्यांनी तातडीनं रुग्णवाहिका बोलावली. गाडी ज्या कालव्यात कोसळली होती, त्या कालव्यात उतरायला जागा नसल्यानं बचाव कार्य करण्यात अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे स्थानिकांनी दोरीच्या सहाय्याने जखमींना बाहेर काढून उपचारासाठी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

अधिक वाचा : अखेर बाबा रामदेव यांनी मागितली महिलांची माफी; म्हणाले…

दरम्यान, या अपघातात मीना देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात देशमुख यांची कन्या, नात आणि चालक गंभीर जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Related Stories

बागणीतील मंडळांचा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय

Archana Banage

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

Abhijeet Khandekar

ज्येष्ठांच्या आरोग्यसाठी ‘शरद शतम्’ योजना

Archana Banage

शाहूनगरातील खड्डय़ांचे भरणार ‘प्रदर्शन’

Patil_p

सोलापुरात 10 नवे कोरोनाचे रुग्ण, कोरोना बाधितांची संख्या 145 वर

Archana Banage

रत्नागिरी : गुहागरमध्ये बिबट्याच्या नखांची तस्करी

Archana Banage