Tarun Bharat

ऑस्ट्रेलियन संघाच्या साहाय्यक प्रशिक्षकपदी व्हेटोरी

वृत्तसंस्था/ मेलबोर्न

न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हेटोरीची क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या पुरुष क्रिकेट संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियातर्फे ही घोषणा मंगळवारी करण्यात आली.

डॅनियल व्हेटोरीने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 113 कसोटीत न्यूझीलंडचे प्रतिनिधीत्व केले असून त्यामध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 19 कसोटी सामने खेळले आहेत. भारतातील आयपीएल क्रिकेट स्पर्धेत व्हेटोरीला प्रशिक्षकाचा अनुभव मिळाला आहे. तसेच ऑस्ट्रेलियातील टी-20 बिग बॅश स्पर्धेत त्याचप्रमाणे इंग्लंड आणि विंडीजमध्ये विविध संघामध्ये त्याने प्रशिक्षणाची जबाबदारी यशस्वीपणे हाताळली असल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याची आपल्या राष्ट्रीय संघाकरिता सहाय्यक प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. काही दिवसापूर्वी बांगलादेश संघाकरिता व्हेटोरी फिरकी गोलंदाज सल्लागारही होता. गेल्या मार्चमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने पाकमध्ये कसोटी मालिका जिंकली होती. या मालिकेसाठी तो ऑस्ट्रेलियन संघाचा गोलंदाज प्रशिक्षक होता. ऑस्ट्रेलियाचा संघ पुढील महिन्यात लंकेच्या दौऱयावर कसोटी मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. या मालिकेवेळी ऑस्ट्रेलियन संघाला व्हेटोरीचे मार्गदर्शन मिळणार आहे.

Related Stories

दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये इथिओपियाचे वर्चस्व

Patil_p

हॅलेप, स्वायटेक यांची विजयी सलामी

Patil_p

इंग्लंड महिलांचा भारतावर मालिका विजय

Amit Kulkarni

लाबुशानेचे शतक, नटराजनला दुहेरी यश

Patil_p

‘बॉक्सिंग डे’ कसोटी आजपासून

Omkar B

अल्कारेझ-रुड, स्वायटेक-जेबॉर अंतिम फेरीत

Patil_p