Tarun Bharat

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा कार्यभार डॉ. डी. टी. शिर्के यांच्याकडे

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी . टी . शिर्के (Dr. D. T. Shirke) यांच्याकडे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा कार्यभार सोपवला आहे. आज शनिवार 10 सप्टेंबर रोजी कुलगुरू डॉ. शिर्के मुंबई विद्यापीठाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांच्या कालावधीमध्ये शिवाजी विद्यापीठातील 48 संशोधकांचा जागतिक क्रमवारीत समावेश झाला आहे. तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा म्हणून विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक आणि कर्मचाऱ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन निधी देण्यात आला आहे .कोरोना कालावधीमध्ये ऑनलाईन शिक्षण, परीक्षा आणि निकाल सुरळीत पार पडले आहेत. सामाजिक जबाबदारी म्हणून कोरोनामध्ये शिवाजी विद्यापीठातील सर्व वस्तीगृह कोरोना केअर सेंटरसाठी देण्यात आली होती. तसेच महापुराच्या कालावधीमध्ये कोल्हापूर वासियांना पिण्याचे आणि वापरण्याचे पाणी तसेच जनावरांना मोफत चारा देण्यात आला होता. ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा म्हणून विविध उपक्रम राबवले जातात. एकूणच त्यांच्या प्रशासकीय, शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. शिर्के यांच्याकडे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.

अधिक वाचा : कुणीही आले, तरी ‘बारामती’वर परिणाम नाही

पुढील कुलगुरूंची निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत डॉ. शिर्के मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदी कार्यरत राहतील. एकाच वेळी ते शिवाजी विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडतील. डॉ। शिर्के यांच्या निवडीची वार्ता कळताच शैक्षणिक, सामाजिक अन्य क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Stories

आकाश धावला अन्…रविराज बचावला !

Kalyani Amanagi

मग्रूर रावणामुळे रामायण घडले, खासदार धनंजय महाडिकांचा बंटी पाटलांना टोला

Archana Banage

कोरोचीत शेतकऱ्यांना रान गव्याचे दर्शन

Archana Banage

कोल्हापूर : काखे – मांगले पूलाचे काम १५ सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा – आ. विनय कोरे

Archana Banage

संभाजीराजेंनी उद्याच मुख्यमंत्र्यांशी चर्चेसाठी यावे; सतेज पाटील यांचे आवाहन

Archana Banage

जिल्ह्यात कोरोनाचे नवे पाच रुग्ण

Archana Banage
error: Content is protected !!