ऑनलाईन टीम/तरुण भारत
राष्ट्रपतींच्या निवडणुकीपाठेपाठ आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या (Vice President Election) तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणुकीची अधिसूचना ५ जुलै रोजी जारी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यासाठी १९ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. आयोगाने निवडणुकीसाठी६ ऑगस्ट ही तारीख निश्चित केली आहे. या पदासाठी भाजपकडून मुख्तार अब्बास नक्वी Mukhtar Abbas Nakvi) यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
याआधी राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी (Presidential Election) सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. एनडीएने महिला आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू (Dropadi Murmu) यांना तर विरोधकांनी यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना संयुक्त उमेदवार म्हणून राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली आहे. दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. येत्या २२ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडणार आहे.
सध्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ ११ ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. भाजपकडून मुख्तार अब्बास नक्वी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.