Tarun Bharat

केएलएस, सेंट पॉल्स, सेंट झेवियर्स संघांची विजयी सलामी

बीडीएफए चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा : सेंट मेरीजला बरोबरीत कॅन्टोन्मेंटने रोखले

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित 17 वर्षाखालील बीडीएफए चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन दिवशी केएलएसने अंजुमनचा, सेंट झेवियर्सने के. व्ही. 2 चा, सेंट पॉल्सने एमव्हीएमचा पराभव करून विजयी सलामी दिली तर सेंट मेरीजला कॅन्टोन्मेंटने बरोबरीत रोखले.

लव्हडेल स्कूलच्या स्पोर्टींग प्लॅनेट ऍस्ट्रोटर्फ फुटबॉल मैदानावर घेण्यात आलेल्या   स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे पॅट्रॉन राम हदगल, अध्यक्ष पंढरी परब, उपाध्यक्ष गोपाळ खांडे, सचिव अमित पाटील, एस. एस. नरगुडी, माजी सचिव उमेश मजुकर, स्पर्धा सचिव मतिन इनामदार व मानस नायक आदी मान्यवर उपस्थित होते.

केएलएस व अंजुमन संघांच्या खेळाडूंची ओळख करून पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण 14 संघानी भाग घेतला असून, उद्घाटनाचा सामना केएलएस व अंजुमन यांच्यात झाला. या सामन्यात 14 व्या मिनिटाला तन्मय पाटीलच्या पासवर शाकीब जागीरदारने गोल करून आघाडी मिळवून दिली. 15 व्या मिनिटाला शशांक आर. च्या पासवर शाकीब जागीरदारने दुसरा गोल केला तर 18 व्या मिनिटाला तन्मय पाटीलच्या पासवर नमित पाटीलने गोल करून 3-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱया सत्रात 44 व्या मिनिटाला चैतन्य रामगुरवाडीच्या पासवर शाकीब जागीरदारने चौथा गोल केला. 48 व्या मिनिटाला नमित पाटीलने बचावफळीला चकवत पाचवा गोल करून केएलएसला 5-0 ची आघाडी मिळवून दिली.

दुसऱया सामन्यात सेंट झेवियरने के. व्ही. 2 चा 8-0 असा पराभव केला. या सामन्यात चौथ्या व सातव्या मिनिटाला रेहान किल्लेदारच्या पासवर स्पर्श देसाईने सलग 2 गोल केले. 18 व्या मिनिटाला पंकजच्या पासवर रेहानने तिसरा गोल केला. तर 24 व्या मिनिटाला स्पर्श देसाईने चौथा गोल करून 4-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱया सत्रात 36 व 42 व्या मिनिटाला स्पर्श देसाईने सलग 2 गोल करून 6-0 ची आघाडी मिळवून दिली. 47 व्या मिनिटाला रेहान किल्लेदारने तर 49 व्या मिनिटाला पंकज अनगोळकरने गोल करून 8-0 ची आघाडी मिळवून दिली.

तिसऱया सामन्यात सेंट मेरीज संघाला कॅन्टोन्मेंट संघाने बरोबरीत रोखले. या सामन्यात पहिल्या सत्रात सेंट मेरीजने आक्रमक चढाया केल्या, पण गोल करण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे पहिल्या सत्रात गोलफलक कोराच राहिला. दुसऱया सत्रात पुन्हा सेंट मेरीज व कॅन्टोन्मेंट संघांनी एकमेकावर चढाया केल्या व दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने सामना बरोबरीत राहिला. चौथ्या सामन्यात सेंट पॉल्स संघाने एमव्हीएमचा 4-1 असा पराभव केला. या सामन्यात 13 व्या मिनिटाला अथर्वच्या पासवर कुशलने पहिला गोल केला तर 23 व्या मिनिटाला कुशलच्या पासवर हुझाफाने गोल करून 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. 38 व्या मिनिटाला अथर्वने तिसरा गोल केला. 40 व्या मिनिटाला एमव्हीएमच्या राहुलच्या पासवर सुजल मुतकेकरने गोल करून 1-3 अशी आघाडी कमी केली. 45 व्या मिनिटाला अथर्वच्या पासवर सुजल जी.ने गोल करून 4-1 असा विजय निश्चि केला.

Related Stories

सर्व्हरडाऊनमुळे आयटीआय विद्यार्थी परीक्षेला मुकले

Amit Kulkarni

शहरातील विविध ठिकाणी शेअरिंग सायकल उपलब्ध

Patil_p

श्रीपंत महाराजांचा पालखी सोहळा उत्साहात साजरा

Amit Kulkarni

खानापुरात ख्रिसमस अत्यंत साधेपणाने साजरा

Omkar B

राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत बेळगावच्या जलतरणपटूंचे यश

Amit Kulkarni

औद्योगिक कामगारांची पोलिसांकडून अडवणूक

Amit Kulkarni